सह्याद्री न्यूज नेटवर्क |
पांढरकवडा : तालुक्यातील मजुरी करणाऱ्या इसमाच्या 14 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. ती आश्रम शाळेतील 9 व्या वर्गात शिकत होती. शाळा बंद असल्यामुळे ती घरीच होती. 27 नोव्हेंबर रोजी घरासमोर एका स्पर्धेचा कार्यक्रम असल्याने तिचे वडील कार्यक्रम बघण्यासाठी गेले. रात्री 10 च्या नंतर घरी ते परत आल्या नंतर मुलगी दिसली काय म्हणून विचारण्यात आले. ती शौचास जाते म्हणून सांगून गेली, तिचा शोध घेतला असता ती कुठे आढळून आली नाही. नातेवाईक व मैत्रिणीकडे फोन करून विचारपूस केली. परंतु तिचा शोध लागला नाही. काल मुलीच्या वडीलाने पोलिसात या बाबत तक्रार दाखल दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला.
नवव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचे अपहरण,पोलिसात तक्रार दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 01, 2021
Rating:
