सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : सिंदेवाही-तालुक्यातील लाडबोरी येथील रहिवासी सुनील गेडाम हे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर दि.२४ नोव्हेंबर २०२१ पासून आपल्या न्यायोचित मागण्या घेऊन आमरण उपोषण करीत आहेत. मात्र, येथील प्रशासन व शासन हे त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच सिंदेवाही तहसीलदार यांना जाब विचारण्याकरिता तहसील कार्यालय सिंदेवाही येथे काल साेमवारी ऑल इंडिया पँथर सेना धडकली.
"सुनील गेडामला न्याय मिळालाच पाहिजे...मिळालाच पाहिजे" "होश मे आयो होश मे आयो, होश मे आके बात करो."अश्या घाेषणांनी तहसील कार्यालय परिसर अक्षरशा दुमदुमला होता. दरम्यान ऑल इंडिया पँथर सेनेने आपल्याकडे उपस्थित नागरिकांचे या वेळी लक्ष वेधून घेतले हाेते. ऑल इंडिया पँथर सेना ही दि. २९ नोव्हेंबर २०२१ ला पँथर सेना तहसीलदार यांना जाब विचारण्याकरीता त्यांच्या कार्यालयात पोहचली.व तहसीलदार गणेश जगदाळे यांच्याशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. चर्चेत तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्या परवानगी घेऊन सुनील गेडाम यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्यांवर जिल्हाधिका-यांशी चर्चा करून लवकरच त्यांना उपोषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे ऑल इंडिया पँथर सेनेला आश्वासन दिले.
त्यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, जिल्हा युवाध्यक्ष अजयभाऊ झलके, जिल्हा सल्लागार सुरेशजी डांगे, पोंभुर्ना तालुका अध्यक्ष सचिन आत्राम, सिंदेवाही तालुकाध्यक्ष आक्रोश खोब्रागडे, तालुका युवाध्यक्ष तथागत कोवले, तालुका कार्याध्यक्ष अंबादास दुधे, उपाध्यक्ष जितेंद्र नागदेवते, महेंद्र कोवले, तेजेंद्र नागदेवते, उपकार खोब्रागडे तथा समस्त पँथर सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सिंदेवाही तहसील कार्यालयासमोर धडकली पँथर सेना !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 01, 2021
Rating:
