टॉप बातम्या

चंद्रपूरात खंडणी प्रकरणात एका राजकीय नेत्यास अटक


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : गाेंडपिंपरी तालुक्यात एका राजकीय पक्षाच्या नेत्याने तलाठ्यांस खंडणी मागितली हाेती. नंतर त्या तलाठ्याने पाेलिसात तक्रार करुन त्या नेत्यास खंडणी घेतांना काही दिवसांपुर्वी रंगेहात पकडुन दिले हाेते. ही बातमी ताजी असतांनाच  शुक्रवार (ता.17 दिसें.) ला येथील आरटीआे कार्यालयातील एका वरिष्ठ अधिका-यास खंडणी मागण्याचा चंद्रपूरातील राष्ट्रवादी पक्षाच्या नयन साखरे यांनी तगादा लावला हाेता.

त्या अधिका-यास त्याने चक्क दरमहा पन्नास हजार रुपयांची मागणी केल्याची चर्चा आहे. आरटीआे कार्यालयातील त्या वरिष्ठ अधिका-यांने त्याच राजकीय नेत्याच्या बाबतीत रामनगर पाेलिस स्टेशनला या पुर्विच तक्रार नाेंदविली हाेती .सदरहु तक्रारीच्या आधारे सायबर सेलच्या पाेलिसांनी नयन साखरे यांस ३५ हजार रुपयांची खंडणी घेतांना रंगेहात पकडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पाेलिस या बाबतीत अधिक व सखाेल चाैकशी करीत आहे.

दरम्यान खंडणी गुन्ह्यात अडकलेल्या या नेत्याने अनेक शासकीय कार्यालयात माहितीचा अधिकार खाली माहिती मागण्यांचा सपाटा लावला असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. दरम्यान आज नयन साखरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन हकालपट्टी केल्याचे ताजे वृत्त आहे.
Previous Post Next Post