वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पुसद आणि उमरखेड मध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 

उमरखेड़ : वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड या तालुक्यांमध्ये वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया ची शाखा स्थापन करणे व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे करण्याकरिता पुसद आणि उमरखेड च्या विश्रामगृहात वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात वेल्फेअर पार्टी ऑफ इंडीयाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अबरार अहेमद खान,पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिर्झा अतवार बैग,जिल्हा उपाध्यक्ष निलेश त्रिपाठी,जिल्हा संघटक सचिव वासीक जुबेर शेख हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अबरार अहेमद खान यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया या पक्षाबाबत सांगितले की हे पक्ष नैतिक सिद्धांताच्या आधारावर स्थापित करण्यात आलेले आहे आणि याच दृष्टिकोनातून पक्षाची पुढची वाटचाल सुरू राहील। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा,तालुका व गाव पातळीवर लोकशाही पद्धतीने पक्षाची स्थापना करून पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात येईल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया हे आपले उमेदवार निवडणुकीत उभे करणार आहात.

या मेळाव्यामध्ये पुसद येथून एजाज अहमद खान,गफ्फार आतिश,प्रो.सैय्यद सलमान,मसूद मिर्ज़ा,अमजद खान,आकिब रिजवी, मोहम्मद जांबाज,सोहेल रिजवी,आतिफ शेख,शकील बागवान,हाफिज समीर रब्बानी आणि उमरखेड मधून महमूद जनाब,कासिम अली,इब्राहिम अली नवाब,जावेद मंसूरी,मज़हरोदिन,शारुख पठान,एस.के ज़मीर,ताहिर मिर्ज़ा,देवानंद डी मोरे या सह तालुक्यांमधून समाजसेवेची व राजकारणाची जाणीव असलेले असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. ह्या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थितांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अबरार अहेमद खान यांच्या सोबत येऊन पक्ष बळकट करण्यासाठी वचनबद्धता दिली.
वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पुसद आणि उमरखेड मध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पुसद आणि उमरखेड मध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on December 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.