सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री शिराेमनी संताजी जगनाडे महाराज यांचा काल बुधवार दि.८ डिसेंबरला चंद्रपूरसह जिल्ह्यात जन्मोत्सव कार्यक्रम उत्साह व थाटात पार पार पडला.
येथील स्थानिक पंचतेली समाज हनुमान मंदिर कमिटी , तैलिक युवा व महिला यलगार संघटना आणि महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेचे वतीने जटपूरा गेट परिसरातील हनुमान मंदिर देवस्थानात श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यांत आली या निमित्ताने महिला भजन मंडळीचा सकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यांत आला हाेता तर काही ठिकाणी रक्तदान शिबिरे पार पडली.
जटपुरा वार्डात पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रामुख्याने पंचकमेटी हनुमान देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रविभाऊ जुमडे, तेैलिक युवा यलगारचे अध्यक्ष जितेन्द्र इटनकर, महाराष्ट्र प्रांतिक महासभाचे विभागिय अध्यक्ष अजय वैरागडे, अधिवक्ता दत्ता हजारे, रमेशजी भुते, रतन हजारे ,महिला महाराष्ट्र प्रांतिक महासभाच्या उपाध्यक्षा तथा चंद्रपूर मनपाच्या झाेन सभापती छबुताई वैरागडे,नगर सेविका अनुराधा हजारे आदींची उपस्थिती हाेती.
या शिवाय तैलिक महिला यलगार संघटनेच्या चंदा प्रदीप इटनकर, मीनाक्षी गुजरकर, पुजा पडाेळे, प्रणिता जुमडे, विनया मंगरुळकर, सुवर्णा लाेखंडे, शशीकला इटनकर, संगिता कुरझेकर, रेखा वैरागडे, कल्पना गिरडकर, कुमुद खनके, अंजली इटनकर, सुलाेचना शेंडे, माया खनके, चेतना येरणे, माधुरी बावणे, वंदना येरणे, सिंधु येरणे, रजनी मेहरकुरे, बेबी येरणे, कुंदा गहुकर, मंगला राने व अनिता झाडे उपस्थित हाेत्या.
चंद्रपूरात श्री संत जगनाडे महाराज जन्मोत्सव थाटात व उत्साहात साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 09, 2021
Rating:
