सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : एकीकडे सुशिक्षित बेराेजगारांची संख्या झपाट्याने वाढत असतांनाच विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या महसूल विभागात गेल्या दाेन ते तीन वर्षापासून तब्बल २५२ पदे रिक्त असल्याची बाब समाेर आली आहे. त्यात एक अपर जिल्हाधिकारी, दाेन उप जिल्हाधिकारी ,तहसीलदार सहा, नायब तहसीलदार चवतीस, लेखाधिकारी एक, लघु लेखक (निम्न श्रेणी) आठ, लघु टंकलेखक एक, महसूल सहायक (सरळ सेवा भरती ) पंचेचाळीस, महसूल सहायक (पदाेन्नती) सात, मंडळ अधिकारी दाेन, तलाठी सव्वीस, शिपाई अडतीस, वाहन चालक नव, व काेतवालाची चव-यातर अश्या रिक्त पदांचा समावेश आहे. सदरहु पदे शासनाने भरली नसल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक अधिकारी व कर्मचा-यांना अतिरिक्त कार्यभार सांभाळा लागताे ही वस्तुस्थिती आहे. जिल्हा प्रशासना कडुन या रिक्त पदांचा अहवाल शासनाला दरवर्षि पाठविला जाताे हे जरी खरे असले तरी आज पर्यंत ही पदे भरली गेली नसल्याचे समजते.
जनतेची कामे वेळेवर व तात्काळ हाेण्यांच्या दृष्टीकाेनातुन ही पदे भरणे महत्वाचे व आवश्यक वाटते.या विभागा प्रमाणेच जिल्ह्यातील इत्तरही विभागात हीच परिस्थिती असल्याचे दिसून येते. स्थानिक लाेकप्रतिनिधीने या कडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल विभागात तब्बल २५२ पदे रिक्त !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 14, 2021
Rating:
