रानडुकराच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी, उपचारार्थ रुग्णालयात भरती !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर - शेतातील काम करुन घरी परत येत असतांना वाटेतच तुलाराम साेमाजी मडावी या ३६ वर्षिय इसमावर एका रानडुकराने हल्ला चढविल्यामुळे ताे गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने सर्वप्रथम नागभिड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यांत आले. सदरहु घटना काल चंद्रपूर जिल्ह्यातील तेलीमेंढा या गावात घडली.

सध्या शेतीचा हंगाम सुरु असुन तुलाराम हा शेतातील काम करण्यासाठी गेला हाेता. दिवस मावळल्यानंतर ताे घरी परत निघाला असतांना वाटेतच रानडुकराने त्याचेवर हल्ला चढविला त्यामुळे त्याचे हाताला,पायाला व नाकाला गंभीर दुखापत झाली. ग्रामीण रुग्णालय नागभिड येथील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे अनुषंगाने शुक्रवारच्या रात्री ११ वाजता नागभिड ग्रामीण रुग्णालयातुन त्यास चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे. सध्या डॉ. मंडळी त्याचे उपचार करीत आहे.

उपरोक्त घटनेबाबत वनविभागाचे अधिकारी व स्थानिक पाेलिस अधिक चाैकशी करीत आहे. दरम्यान हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तुलारामला तातडीने शासनाने मदत करावी अशी मागणी प्रहार सेवक वृषभ खापर्डे, निलेश डाेमळे, विकी फुलवाणी, देवनाथ रामटेके, दीपक माणूसमारे, राहुल दडमल, राेहीत कुमरे, अक्षय खाेब्रागडे, राेहित चौधरी, निखिल मेश्राम, संताेष जिवताेडे व आकाश चौधरी यांनी केली आहे.
रानडुकराच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी, उपचारार्थ रुग्णालयात भरती ! रानडुकराच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी, उपचारार्थ रुग्णालयात भरती !  Reviewed by सह्याद्री चौफेर on November 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.