एमएसईबी च्या वीज खांबावरच चोरट्यांनी मारला डल्ला, १८ विज खांब व जर्मनची विद्युत तार चोरट्यांनी केली लंपास
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी भालर मार्गावरील विज खांबावरील वीज प्रवाह सुरळीत सुरु आहे की नाही, याची पाहणी करण्याकरिता गेलेल्या एमएसईबी च्या अधिकारी कर्मचाऱ्यांना लोखंडी विज खांब कापून ते रस्त्याच्या कडेला पडलेले दिसले. काही खांब लंपास करण्यात आल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. खांबावरील जर्मनची तार सुद्धा चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. काही विज खांब कापून रस्त्याच्या कडेला पडलेले दिसल्याने कुणी चोरटे याकडे फिरकते काय, याकडे लक्ष ठेऊन असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन चोरटे विज खांबाजवळ आल्याचे दिसताच त्यांनी याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार दिली. एमएसईबी चे प्रधान तंत्रज्ञ गुलाब मारोती राजूरकर यांच्या तक्रारींवरून पोलिसांनी विज खांब व खांबावरील जर्मनची विद्युत तार लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक केली. ताहीर शेख (२२) रा. शास्त्री नगर व सोहेल शेख (१८) रा. फुकटवाडी अशी या चोरट्यांनी नावे आहेत. त्यांनी ५४ हजार रुपये किमतीचे १८ लोखंडी विज खांब कापून लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच २९ हजार रुपये किमतीची जर्मनची विद्युत तार सुद्धा चोरट्यांनी चोरी केली. एकूण ८३ हजार रुपयांच्या शासकीय मुद्देमालावर चोरटयांनी डल्ला मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन्ही चोरट्यांवर पोलिसांनी भादंवि च्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पिएसआय शिवाजी टिपूर्णे करित आहे.
एमएसईबी च्या वीज खांबावरच चोरट्यांनी मारला डल्ला, १८ विज खांब व जर्मनची विद्युत तार चोरट्यांनी केली लंपास
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 13, 2021
Rating:
