२५७ अवैध रेती वाहनांवर महसूल प्रशासनाच्या कारवाया !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्यातील अवैध रेती व मुरुम उत्खनांवर अंकुश लावण्यासाठी तथा अवैध रेती वाहुतकीवर दंडात्मक कारवाया करण्याच्या हेतूने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा चंद्रपूर एसडीओ राेहण घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम या शिवाय उपविभागीय स्तरावरील उपविभागीय अधिकारी तथा तालुक्यातील सर्व तहसीलदार यांचे मार्गदर्शनाखाली महसुल विभागातील खनिकर्म कर्मचारी, वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, मंडळ अधिकारी, पटवारी व काेतवाल यांनी वरिष्ठ अधिका-यांच्या आदेशाचे पालन करित फिरते पथक तयार करुन त्यांनी दि.१-४-२०२१ ते  ३१-१०- २०२१ या कालावधीत विशेष माेहिम राबवित व गुप्त माहितीच्या आधारे, वेळ प्रसंगी जिव धाेक्यात टाकून तब्बल २५७ अवैध रेतींची वाहने जप्त करुन त्या वाहन मालकांवर दंडात्मक कारवायां केल्या आहे. दरम्यान या दंडापाेटी २,६३,२४,५५०/- रुपये शासनाच्या तिजाेरीत आता पर्यंत जमा झाला असल्याचे खात्री लायक वृत्त आहे. सदरहु कारवाया करतांना अधिकारी व कर्मचा-यां वर दाेन ठिकाणी हल्ले सुध्दा झाले. तर अवैध रेतीच्या अठरा  प्रकरणात उपराेक्त तस्करांवर पाेलिस गुन्हे दाखल हाेवून २१ जणांना अटक झाल्याचे समजते. या धडक कारवायामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध रेती तस्करांवर काही प्रमाणात का हाेईंना अंकुश बसला हे मात्र, तेव्हढेच खरे आहे.
चद्रपूरच्या अपर जिल्हाधिकारी वरखेडकर आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम यांचे मार्गदर्शना खाली खनिज निरीक्षक बंडू वरखडे, दिलीप माेडके तथा भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक अल्का खेडकर (जिल्हा भरारी पथकात सहभागी असलेले अधिकारी व कर्मचारी) यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जिल्हाभर दाैरा करुन अश्या अवैध रेती वाहनांवर कारवाया करण्याचा एकंदरीत सपाटा लावला असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यातील भरारी पथकांनी अवैध रेती उपसा व मुरुम उत्खननसाठी वापरात येणारे जेसीबी, पाेकलैंड, व इत्तर साहित्य एकूण सात जप्त केल्याचे कळते. सध्या तरी अवैध रेती माफियांचे या धडक कारवायामुळे अक्षरश: धाबे दणाणले आहे.

 
२५७ अवैध रेती वाहनांवर महसूल प्रशासनाच्या कारवाया ! २५७ अवैध रेती वाहनांवर महसूल प्रशासनाच्या कारवाया !  Reviewed by सह्याद्री चौफेर on November 18, 2021 Rating: 5
Powered by Blogger.