सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : चंद्रपुर शहरातील महानगर पालिका हद्दीत येत असलेल्या इंदिरा नगर, क्रिष्णा नगर, श्याम नगर, राजीव गांधी नगर आणि संजय नगर येथील जवळपास ३५ हजार लोकसंख्या असलेल्या परिसरातील नागरिकांतर्फे इंदिरा नगर स्मशानभूमीतच अंत्यविधी केला जातो.
एवढ्या मोठ्या लोकसंख्येकरिता फक्त एकच स्मशानभूमी असून आज ती दुरावस्थेत आहे. या स्मशानभूमीत प्राथमिक सुविधा जसे अंत्यविधी प्लॅटफॉर्म आणि शेड पूर्णतः तुटलेला असून प्रसाधनगृह अभाव, पाण्याच्या सुविधेचा अभाव, बसण्याकरिता बेंचेस अभाव, जळावू लाकडांचा तुटवडा, तसेच ताे परिसर अस्वच्छ आहे. या प्राथमिक सुविधा नसतांनाही देखील नागरिकांना नाईलाजास्तव अंत्यविधी या स्मशानभूमीत करावा लागत आहे. हे या भागातील नागरिकांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.
सदरहु परिसरातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने कुठल्याही सुविधा पुरविल्या नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना ताेंड द्यावे लागत आहे. या परिसरात स्मशान भूमी हाेणे अत्यंत गरजेचे व महत्वाचे झाले असतांना देखील मनपा प्रशासन काळजीने लक्ष पुरवित नाही ही अत्यंत खेदाची बाब असल्याची प्रतिक्रिया जितेश कुळमेथे यांनी आज बाेलतांना व्यक्त केली. दरम्यान आज एका शिष्टमंडळाने इंदिरा नगर, किष्णा नगर, स्याम नगर, राजीव गांधी नगर आणि संजय नगर येथील नागरिकांची स्मशानभूमी बाबतची अडचण लक्षात घेऊन आयुक्तांसह मनपा पदाधिका-यांनी स्वतः इंदिरा नगर येथील स्मशानभूमीमध्ये प्राथमिक सुविधा तात्काळ उपलब्ध करून देवून सदरहु परिसराचे सौंदर्यीकरण एक महिन्याच्या आत प्रशासनाने करुन द्यावे, अशा आशयाचे एक निवेदन प्रशासनाला सादर केले. अन्यथा या परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन जनआंदोलन उभारण्यात येईल. असा इशारा यंग चांदा ब्रिगेड आदिवासी आघाडीचे जितेश कुळमेथे यांनी मनपाला सादर केलेल्या निवेदनातुन दिला आहे.
इंदिरा नगर परिसरातील नागरिकांना स्मशानभूमी उपलब्ध करुन द्या - अन्यथा आंदोलन छेडू !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 18, 2021
Rating:
