सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नांदेड : सणासुदीच्या काळामध्ये सुरु असलेल्या राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य शासनाने तातडीने भूमिका घेत त्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावे अशी आग्रही मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेच्या उपकार्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर यांनी परिवहन मंत्री यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
उपकार्याध्यक्षा यांनी केलेल्या मागणीत म्हटले की, एस टी महामंडळा च्या विषयांकित मागणी बऱ्याच वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असून त्यांची मागणी रास्त आहे. याचा शासनाने तात्काळ विचार करून त्यांची मागणी मान्य करावी.
एस टी कर्मचारी हे सणासुदीच्या काळात व अत्यंत अडचणीच्या काळातही रात्रंदिवस काम करत असतात.
त्यांचे वेतनही अल्प असते.त्यांची होणारी वार्षिक वेतनवाढही अल्प असते. म्हणजे कामाच्या मोबदल्यात त्यांना पुरेसा मिळत नाही. याशिवाय आर्थिक परिस्थितीमुळे एस टी महामंडळ जे पगार करते ते पगार वेळेत होत नाही. असा सर्व बाजूनी एस टी कर्मचारी सापडले आहेत. त्यामध्ये अनेकांची आर्थिक कुचंबणेमुळे कुटुंबाचे हाल होत आहेत. आर्थिक विवंचनेमुळे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केले आहेत. अत्यंत दु:खदायक आहे. अशावेळी महाराष्ट्र शासनाने तातडीने पुढाकार घेत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी साहेब यांच्या मार्फत मा. परिवहन मंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्याकडे उपकार्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर यांनी केली आहे.
स्वामी यांनी केलेल्या या मागणीबाबत एस टी आगार व्यवस्थापक साहेब नांदेड व एस टी कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार जन विरोधी आक्रोश च्या सीमा स्वामी लोहराळकर यांचे अभिनंदन केले.
एस टी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे - सीमा स्वामी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 11, 2021
Rating:
