ऐन दिवाळीत शहरात पसरला अंधार, शहरातील पथदिवे लागलेच नाही !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : घरोघरी दीप उजळून अंधकार दूर करणारा दिवाळीचा सण अद्याप संपला नसतांनाच काल शहरातील पथदिवे बंद राहिल्याने रस्त्यांवर मात्र काळाकुट्ट अंधार पसरला होता. अंधाराला चिरून प्रकाशाची वाट दाखविणारा दिवाळी हा सण सुरु असतांनाच शहरात अंधार पसरल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केल्या जात होता. मागील काही महिन्यात दिवसभर सुरु राहणारे पथदिवे ऐन दिवाळीत रात्री असे अचानक बंद का, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात होता. दिवसाढवळ्या शहरातील पथदिवे सुरु ठेवणारा विद्युत विभाग रात्री पथदिवे बंद करतो की काय, असे वाटायला लागले होते. विद्युत बिलाचा भरणा करावा लागत नसल्यागत दिवसालाही पथदिवे सुरु ठेवणारा विद्युत विभाग आता रात्रीला पथदिवे बंद ठेऊ लागला आहे. शहराला अंधारात ठेऊ लागला आहे. विद्युत बिलाची रक्कम वाढली की, विद्युत बिलाचा भरणाचं केला नाही, अशी खमंग चर्चा आज शहरातून ऐकायला मिळाली. प्रकाशाचा उत्सव सुरु असतांना शहरात पसरलेला अंधार नगरपालिकेच्या अंधाधुंद कारभाराची साक्ष देत होता. त्यामुळे अंधारलेल्या वाटेला आता नव्याने प्रकाशमान करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात पसरलेला हा अंधार दूर सारण्याकरिता येणाऱ्या काळात आधी नागरिकांना अंधारात ठेवणाऱ्यांनाच दूर ठेवले पाहिजे. बेजबाबदारपणाचा कळस गाठणाऱ्यांना जबाबदार व्यक्ती म्हणून महत्वाच्या ठिकाणी पाठविणे बंद केल्याशिवाय शहरातील हा अंधार दूर होणार नाही. नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे पसरलेला हा अंधार काही काळा पुरताच असून हा अंधार दूर करण्याची संधी नागरिकांना लवकरच मिळणार आहे. 
शहरातील पथदिवे काल बंद राहिल्याने शहरात सर्वत्र अंधार पसरला होता. कधी दिवसाढवळ्या सुरु राहणारे पथदिवे ऐन दिवाळीच्या पर्वावर काल रात्री बंद राहिल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी दिसून आली. दिवसा पथदिवे सुरु ठेऊन विद्युत खर्ची घालणारा विद्युत विभाग आता रात्री पथदिवे बंद ठेऊन विजेची बचत करू लागला आहे. विज बिल येत नसल्यागत दिवसाला पथदिवे सुरु ठेऊन नागरिकांच्या जखमेवर मिठ चोळणारा विद्युत विभाग आता रात्रीला पथदिवे बंद ठेऊन शहरात अंधार पसरवू लागला आहे. दिवस रात्र पथदिवे सुरु ठेवल्याने विजेचे बिल जास्त आले की काय, अशी खमंग चर्चा शहरात ऐकायला मिळत होती. कित्येक दिवस पर्यंत दिवसाढवळ्या पथदिवे सुरु राहिले. कित्येकदा नगर पालिकेच्या लक्षात आणून दिल्यानंतरही पथदिवे बंद करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. वीज वितरण कंपनीने नगरपालिकेला वीज बिल आकारणे बंद केले की, काय अशा प्रकारे दिवसाला पथदिवे सुरु रहात होते. परंतु आता रात्रीला पथदिवे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. आज शहरातील पथदिवे बंद राहिल्याने शहरात काळाकुट्ट अंधार पसरलेला होता. ऐन दिवाळीत नागरिकांच्या वस्तीत अंधार पसरल्याने नागरिकांमध्ये कमालीचा संताप दिसून येत होता.
ऐन दिवाळीत शहरात पसरला अंधार, शहरातील पथदिवे लागलेच नाही ! ऐन दिवाळीत शहरात पसरला अंधार, शहरातील पथदिवे लागलेच नाही ! Reviewed by सह्याद्री चौफेर on November 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.