सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
याबाबत नायब तहसीलदार कापसीकर यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार नांदेपेरा कडून रेती भरलेला मिनी ट्रक संविधान चौकाकडे येत असल्याची माहिती मिळाल्याने त्याठिकाणी जाऊन त्या मार्गाने येणाऱ्या वाहनांकडे बारीक लक्ष ठेवले असता एक मिनी ट्रक येतांना दिसला. त्या वाहनाला थांबवून वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये रेती भरलेली असल्याचे आढळून आले. चालकाकडे रेतीचा परवाना नसल्याने अवैधरित्या रेतीची वाहतूक केल्या जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आढळून आले. अधिकऱ्यांनी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कार्यवाही करून रेतीसह वाहन ताब्यात घेतले. अवैध रेतीची वाहतूक करणारे MH २९ M ४७४ हे वाहन मदन पेंदाने यांच्या मालकीचे असून त्यांच्यावर कार्यवाहीची प्रक्रिया सुरु असल्याने नायब तहसीलदार कापसीकर यांनी सांगितले आहे. या वाहनामध्ये अंदाजे एक ब्रास रेती असून सदर रेती ही रेतीचा साठा असलेल्या ठिकाणावरून आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन मालकावर गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही नायब तहसीलदार कापसीकर यांनी सांगितले आहे.
अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे वाहन महसूल विभागाने पकडले
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 23, 2021
Rating:
