दालमिया कंपनी समाेर कामगाराचे उपाेषण सुरुच - ५ जणांची प्रकृती खालावली ?

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : काेरपना तालुक्यातील भारत दालमिया कारखान्यासमाेर दि.२३ नाेव्हेंबर पासून कामगारांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपाेषण पुकारले असून या उपाेषणाचा आज चवथा दिवस आहे.

दरम्यान या उपाेषण मंडपात उपाेषणाला अनुक्रमे अशाेक निळकंठ कुचनकार (नारंडा), दशरथ सुधाकर वडस्कर (अंतरगांव), श्रीकांत तुळशिराम धानाेरकर (पिंपळगांव) गड, अनिल दादाजी आत्राम (नारंडा), निळकंठ बाळकृष्ण लांडगे (नारंडा), राजेन्द्र छब्बी दुर्वे (नारंडा) व जीवनलाल जगतपाल निषाद (गडचांदूर) हे बसले असून आज शनिवार दि.२७ नाेव्हेंबरला वैद्यकिय चमूने उपाेषण कर्त्यांची प्रकृती तपासणी केली असता यातील पाच कामगारांना रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉ.मंडळीने दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या आधी या कामगारांनी आपल्या रास्त मागण्या पदरात पडाव्या या साठी धरणे आंदोलन पुकारले हाेते परंतु त्या आंदाेलनातुन त्यांचे मागण्यांची पुर्तता झाली नसल्याने शेवटी या कामगारांनी बेमुदत उपाेषणाचा पवित्रा उचलला. अद्याप शासन व प्रशासनाने त्यांचे या सुरु असलेल्या उपाेषणाची दखल घेतली नाही हे येथे उल्लेखनिय आहे.

सदरहु आंदोलन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमांतुन सुरु असून आंदोलन स्थळी पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांत आला आहे.
दालमिया कंपनी समाेर कामगाराचे उपाेषण सुरुच - ५ जणांची प्रकृती खालावली ? दालमिया कंपनी समाेर कामगाराचे उपाेषण सुरुच - ५ जणांची प्रकृती खालावली ? Reviewed by सह्याद्री चौफेर on November 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.