चंद्रपूरात २६ नागरिकांना मिळाला उज्वला गॅस याेजनेचा लाभ !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरचे सचिव चंदन पाल यांनी शास्त्रीनगर प्रभागातील 26 नागरिकांना प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा लाभ महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात मिळवून दिला. त्या निमित्ताने लाभार्थ्यांना गॅस वितरणाचा कार्यक्रम नेहरू नगर येथील समाज भवनात आयोजित करण्यात आला होता. महिलांच्या सक्षमीकरणात उज्वला गॅसचे योगदान माेठे असल्याचे भारतीय जनता पार्टी महानगरचे जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना म्हणाले. धूर मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करणारी ही योजना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्या नंतर उपमहापौर राहुल पावडे यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच 160 नागरिकांच्या ई-श्रमिक कार्डची व 120 मतदान कार्डसाठी नोंदणी करण्यात आली.

सदरहु कार्यक्रमात भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य
तुषार सोम, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, मंडळ अध्यक्ष विठ्ठल डुकरे, बंगाली आघाडी अध्यक्ष
दिपक भट्टाचार्य, नगरसेविका वनिता डुकरे, मंडळ महामंत्री मनोरंजन रॉय, राम हरणे, महानगर सचिव रवी जोगी, सारिका संदूरकर, सतीश तायडे, बंगाली आघाडी महामंत्री कृष्णा कुंडू, शंकर सुडीत, उमेश गुजर, अनुप देवना, प्रशांत बोबडे, आशु रॉय, राज सोनू, उमेश साळुंखे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
चंद्रपूरात २६ नागरिकांना मिळाला उज्वला गॅस याेजनेचा लाभ ! चंद्रपूरात २६ नागरिकांना मिळाला उज्वला गॅस याेजनेचा लाभ ! Reviewed by सह्याद्री चौफेर on November 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.