महाराष्ट्र ट्रायबल आघाडी तर्फे संविधान दिवस कार्यक्रमाचे आयोजन

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे

वणी : येथील कुवारा भिवंसन देवस्थान वणी पाण्याच्या टाकी जवळ दिनांक 26 नोव्हेंबर 2021 ला महाराष्ट्र ट्रायबल आघाडी च्या वतीने "संविधान दिवस" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी आदिवासी बांधवानी दुपारी साय.५ वाजता हजर राहण्याचे आवाहन महाराष्ट्र ट्रायबल आघाडी च्या तर्फे करण्यात आले आहे.

मागील दीड वर्षात कोरोना महामारी मुळे ज्या आदिवासी बांधवाना आपला जीव गमवावा त्या सर्वाना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याचेही आयोजकांच्या वतीने सांगण्यात येते. तसेच "संविधान दिवस" व "शामादादा कोलाम" जयंती दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाजाच्या विकासासाठी संविधान जागृती करणे काळाची गरज ठरली आहे. या निमित्ताने महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे राज्य अध्यक्ष मा. गीत घोष व राज्य उपाध्यक्ष मा.अॅड. संतोष भादिकर हे 'भारतीय संविधान व आदिवासी समाज' या विषयावर प्रबोधन करणार आहे. तरी सर्व समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. असे आयोजकांच्या वतीने वणी विधानसभा क्षेत्रातील बांधवाना आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्र ट्रायबल आघाडी तर्फे संविधान दिवस कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र ट्रायबल आघाडी तर्फे संविधान दिवस कार्यक्रमाचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on November 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.