अनुसूचित जमातीच्या युवकांना भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण आयोजित करा - आदिम शामादादा कोलाम संघटनेची मागणी


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

पांढरकवडा : राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक आदिवासी युवकांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना सन 2021-22 या सत्रासाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन राळेगाव शामादादा कोलाम संघटनेच्या वतीने दिनांक 24 नोव्हेंबर ला पांढरकवडा एकात्मिक प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आले.

महाराष्ट्र सरकार कडून मेगा पोलीस भरती होणार असून, त्या भरतीचा लाभ अनुसूचित जमातीच्या युवकांना व्हावा, सरकारी सेवेत जमातीच्या युवकांची संख्या वाढावी यासाठी प्रशिक्षण आयोजित करणे आवश्यक असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

स्पर्धा परीक्षेच्या काळात स्पर्धा अधिक वेगवान होत आहे. या स्पर्धेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण असल्यास त्याचा लाभ या मेगा भरतीमध्ये होऊ शकतो. खाजगी प्रशिक्षण वर्गाचा खर्च आर्थिक बाजू कमकुवत असलेले अनुसूचित जमातींचे युवक करू शकत नाही. त्यामुळे लवकर भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित करून जमातींच्या युवकांना न्याय द्यावा यासाठी एकात्मिक प्रकल्प अधिकारी पांढरकवडा यांना मागणी करण्यात आली.

यावेळी आदिम जमात शामादादा कोलाम संघटनेचे निलेश पिपरे, निलेश रोठे, अमित ढोबळे, समीर कोंडेकर, आकाश टेकाम, ज्ञानेश्वर मेश्राम, पिंटू जांभुळकर, स्वप्नील आत्राम, आकाश भि.टेकाम, सपना मेश्राम, आदींची उपस्थिती होती.

अनुसूचित जमातीच्या युवकांना भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण आयोजित करा - आदिम शामादादा कोलाम संघटनेची मागणी अनुसूचित जमातीच्या युवकांना भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण आयोजित करा - आदिम शामादादा कोलाम संघटनेची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on November 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.