सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागाव : येथील नगरपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण दि.१२ नोव्हेंबर रोजी जाहिर करण्यात आले. यामध्ये ९ प्रभाग विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे.
प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी आरक्षण व सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले त्यात प्रभाग क्र. १,१३,१४ आणि १५. येथील जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. नागरिकांसाठी प्रभाग क्र २.३ आरक्षित झाले. अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी प्रभाग क्रमांक ४ तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी प्रभाग क्र. ६.१० राखीव आहे.
प्रभाग क्र.५,८,९,१२,१६ सर्वसाधारण असुन प्रभाग क्रमांक ७,११ नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तर प्रभाग क्रमांक १७ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. १७ पैकी ९ प्रभाग क्र. मध्ये महिलांसाठी आरक्षित झाले आहे.
वरील प्रमाणे सर्व उपस्थितासमोर आरक्षण सोडतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
महागांव : नगरपंचायत आरक्षण सोडत जाहीर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 13, 2021
Rating:
