टॉप बातम्या

समाजसेवक पुराणिक यांचा भव्य सत्कार

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 

वणी : सध्या यवतमाळात वास्तव्य असलेले वणी येथील ज्येष्ठ समाजसेवक सुधाकर पुराणिक सर यांचा सोमवार दि. २९ नोव्हेंबर रोजी जैताई सभाग्रुहात सत्कार आयोजिण्यात आला आहे .

या दिवशी पुराणिक ९० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ते जैताई देवस्थान समितीचे सर्वात ज्येष्ठ संचालक आहेत.

त्यांच्या वर्धापनदिना निमित्त त्या दिवशी संगीतमय सुंदरकांड पाठाचे दुपारी ३ ते ६ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यवतमाळ येथील श्रीराम सुंदरकांड महिला मंडळ सादर करणार आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

बंधु भगिनींनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे अशी विनंती आयोजक जैताई देवस्थान व जैताई अन्नछत्र समिती या संस्थांनी केली आहे.
Previous Post Next Post