सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : वणी-घुग्गुस मार्गावरील तो पेट्रोलपंप वेगवेगळ्या कारनाम्यांमुळं नेहमी चर्चेत असतो. डिजलमध्ये पाणी मिसळणं असो की, डिजलमध्ये होणारी भेसळ असो नेहमी हा पेट्रोलपंप चर्चेचा विषय ठरतो. या पेट्रोलपंपावर शुद्ध पेट्रोल, डिजल मिळत नसल्याची नागरिकांची नेहमी ओरड असते. पाणी मिश्रित व भेसळयुक्त पेट्रोल डिजल वाहनांमध्ये भरण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांमधून ऐकायला मिळतात. डिजलमध्ये भेसळ होत असल्याचे लक्षात आल्याने अनेक वाहतूकदारांनी या पेट्रोलपंपावरून डिजल भरणं देखिल बंद केलं आहे. मिश्रित पेट्रोल डिजल वाहनांमध्ये भरल्या जात असल्याचे वाहनधारकांच्या लक्षात आल्यानंतर वाहनधारकांनी येथील व्यवस्थापकाला कित्येकदा तीक्ष्ण शब्दांची लाखोळीही वाहिली आहे. काही महिन्यांआधी एका कारमध्ये डिजल ऐवजी नुसते पाणी भरण्यात आल्याने कार काही अंतरावर जाऊन बंद पडली. नंतर कार मालकाने या पेट्रोलपंप व्यवस्थापकाची जी काढली, त्यामुळे त्याची चांगलीच नाचक्की झाली. कारमध्ये पेट्रोल कमी असल्याने या पाणी मिश्रित पेट्रोलचा उलगडा झाला. नाही तर हा प्रकार तसाच सुरु राहिला असता. कार मालकाने पाणी मिश्रित पेट्रोल वाहनामध्ये भरण्यात आल्याचे संपूर्ण चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याने या पेट्रोलपंपमधून सुरु असलेला गौडबंगाल नागरिकांना कळला. या पेट्रोलपंपने नागरिकांची विश्वासहर्ता गमावली आहे. वाहनांमध्ये डिजल भरतांना ट्रान्सपोर्ट सुपरव्हायजरशी संगमत करून डिजल वाढवून लिहिण्याचे प्रकारही या पेट्रोलपंपवर उघड झाले आहेत. डिजल क्वांटिटीमध्ये सेटिंग करणारं पंप म्हणूनही या पेट्रोलपंपाची ओळख निर्माण झाली आहे. वाहनधारकांची डिजल पेट्रोल भरतांना अनेकदा या पेट्रोलपंपवर फसवणूकही झालेली आहे. पेट्रोल डिजल भरण्याच्या मशीनमध्ये सेटिंग करून कमी इंधन भरण्यात येत असल्याचा ग्राहकांनी कित्येकदा संशय व्यक्त केला आहे. हवं तेवढं पेट्रोल भरल्यानंतरही काही अंतरावर जाऊन पेट्रोल संपल्याचे अतिशय वाईट अनुभव ग्राहकांना या पेट्रोलपंप वरून डिजल भरल्यानंतर आले आहे. नजर हटी, दुर्घटना घटी असे प्रकार या पेट्रोलपंपवर चालतात. डिजल भरण्याकरिता रस्त्यावर ट्रकांची रांग लागत असल्याने आसपासच्या नागरिकांची रस्त्यावर ट्रक लावण्यावरून पंप व्यवस्थापकाशी नेहमी शाब्दिक चकमक उडत असते. डिजल भरण्या करिता रस्त्यावर आडवी तिडवी वाहनांची रांग लागत असल्याने आसपासच्या परिसराकडे जाणारे मार्गच बंद होतात. त्यामुळे या मार्गाने जाणेयेणे करणाऱ्या नागरिकांचा चांगलाच संताप होतांना दिसतो. डिजल भरण्याकरिता वाहनांची लांबचलांब रांग लागत असल्याने व पंपाच्या बाजूला तासंतास वाहने उभी रहात असल्याने या ठिकाणी नेहमी वाहनांचा जाम लागताना दिसतो. डिजल भरण्याकरिता विरुद्ध दिशेने ट्रकांची लागून असलेली रांग व डिजल भरून सुसाट निघणारे ट्रक अपघाताला आमंत्रण देत आहे. डिजल भरून विरुद्ध दिशेने सुसाट निघणाऱ्या वाहनांमुळे कित्येक छोटे मोठे अपघात झाले आहेत. पण तरीही पेट्रोलपंप व्यवस्थापकाकडून कसलीही खबरदारी घेतली जात नाही. अतिशय कमी जागेत हा पेट्रोलपंप असल्याने वाहने रोडवरच उभी केली जातात. या पेट्रोलपंपवर कोणतीही शिस्तबद्धता नसल्याने डिजल भरणारी वाहने चुकीच्या पद्धतीने उभी केली जातात. त्यामुळे नागरिकांना या वाहनांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा पेट्रोलपंप अशा अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असतो. आता तर हा पेट्रोलपंप नागरिकांची डोकेदुखी ठरू लागला आहे.