सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
मुकूटबन : मिशन कवच कुंडल या मोहिमेअंतर्गत भारतात 'लसीकरण आपल्या दारी' अभिनव उपक्रम, १६ जानेवारी २०२१ पासून राबवण्यात येत आहे. तर झरी जामणी तालुक्यात १३ मार्च पासून राबवण्यात येत आहे. तरी सुध्दा उद्दिष्ठ पार केले नसून पाहिल्या डोसचे ७६ टक्के तर दुसऱ्या डोसचे ३५ टक्केच उद्दिष्ठ पार पाडले आहे. पाहिल्या डोसचे उद्दिष्टपूर्ती पैकी २३:९३ टक्केनी लसीकरणाचं प्रमाण कमी झाल्याने ही तालुक्यासाठी चिंतेची बाब आहे.
झरी जामणी तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र झरी, शिबला व मुकूटबन येथे असून एक ग्रामीण रुग्णालय झरी जामणी येथे आहे. या अंतर्गत १०३ गावे येत असून ७१,९८४ लोकसंख्या आहे.
वय १८ ते वयाला मर्यादा नाही अशी लोकसंख्या ५०,४२५ असून पाहिल्या डोसची उद्दिष्टपूर्ती ५०,३८८ म्हणजेच ९९:९३ टक्के होती. त्यापैकी ३८ हजार ३२३ नागरिकांनी फक्त पहिला डोस घेतला असून पाहिल्या डोसचे ७६ प्रमाण टक्के झााले असून २३:९३ टक्के नी कमी झाली.
तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात १३ मार्च पासून लसीकरण आपल्या दारी ही संकल्पना राबवण्यात येत आहे. ३१ ऑक्टोंबर पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र झरी येथे कोवीशील्ड १३६९५ तर कोवैक्सीन ३९९८ एकूण १७६९३ नागरिकांनी लसीकरण केले. प्राथमिक आरोग्य केंद्र शिबला येथे कोवीशील्ड ६१९० तर कोवैक्सीन १०४४ एकूण ७२३४ नागरिकांनी लसीकरण केले. प्राथमिक आरोग्य केंद्र मुकूटबन येथे कोवीशील्ड २१२३० तर कोवैक्सीन ३८२१ एकूण २५०५१ नागरिकांनी लसीकरण केले. तर ग्रामीण रुग्णालय झरी जामणी येथे कोवीशील्ड ४१२३ तर कोवैक्सीन २०१० एकूण ६१३३ नागरिकांनी लसीकरण केले. तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात व एक ग्रामीण रुग्णालयार कोवीशील्ड ४५२३८ तर कोवैक्सीन १०८७३ असे एकूण ५६१११ नागरिकांनी लसीकरण केले.
झरी जामणी तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने आता प्रशासन जागे होऊन प्रत्यक्ष घरोघरी भेटी देऊन कोरोनाची जनजागृती करीत आहे. तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम यांचे मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, सहायक गटविकास अधिकारी सखाराम इसलकर, तहसीलदार गिरीश जोशी, नायब तहसीलदार महेश रामगुंडे, अशोक ब्राम्हणवाडे, झरीचे वैद्यकीय अधिकारी अशोक गायकवाड, शिबलाचे वैद्यकीय अधिकारी जमीर शेख, मुकूटबनचे वैद्यकीय अधिकारी अरविंद वानखेडे, विस्तार अधिकारी इंदू राखुंडे, आरोग्य सहाय्यक अशोक मस कुल वार, वामन माहूरे, हेमंत कळसकर, सुनील तूमकोड, मेश्राम, कविता राऊत, सुवर्णा काळे, सुनीता पंधरे, तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर व आरोग्य सेविका हे सर्व कर्मचारी ज्यांनी लस घेतली नाही अशा लाभार्थ्यांचा शोध घेऊन लसीकरण करण्यात येत आहे.
"कोरोनासंसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती पाहता, जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास कोव्हिड-19 ची लाट आपण टाळू शकतो. एकीकडे लसीकरणाचा टक्का हळूहळू वाढत असताना ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात लसीकरणाचं प्रमाण घटल्याचं पाहायला मिळतंय. लशींचा तुटवडा नसताना लसीकरणाचं प्रमाण का कमी झालं? लसीकरण कमी झाल्याने तिसऱ्या लाटेची भीती वाढेल का? असे प्रश्न भेडसावत आहे."
ऑक्टोबर महिन्यात लसीकरण कमी होण्याची कारणे:
ऑक्टोबर महिन्यात अनेक उत्सव आलीत. नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात. त्यामुळे लस घेण्यासाठी बाहेर पडले नसतील. सणांच्या दिवसात लस घेतल्यानंतर आजारी पडू नये म्हणून लोक टाळाटाळ करत असण्याची शक्यता. कोव्हिशिल्ड लशीच्या डोसमध्ये ८४ दिवसांचं अंतर. रुग्णसंख्या कमी होत असल्याने बाहेरगावी सुट्टीवर गेलेले नागरिक. लोकांमध्ये कोरोनाची भीती आता राहिलेली नाही. लोक आजाराला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. लसीकरण कमी होण्यामागचं ही कारणे होऊ शकते.
मिशन कवच कुंडल मोहिमेअंतर्गत लसीकरण आपल्या दारी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 10, 2021
Rating:
