चंद्रपूर येथे दोन दिवशीय महसूल कर्मचा-यांचे प्रशिक्षण शिबिर

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्यातील महसूल विभागात कार्यरत अव्वल कारकुन तथा महसूल सहाय्यक यांचे दाेन दिवशीय प्रशिक्षण शिबिर शहरातील स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभाग्रूहात पार पडले .या शिबिराचे उद्घाटन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे शुभ हस्ते(शनिवार दि.२०नाेव्हेंबरला) झाले. त्या नंतर प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली.
से.नि.उ.मु.कार्य.अधिकारी मालेकर यांनी तालुका, उपविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाज पध्दती बाबत प्रशिक्षण दिले तरं बल्हारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी महाराष्ट्र सेवा नियम अधिनियम २०१५ या तरतुदी बाबत आवश्यक माहिती दिली. दुपारच्या सत्रात जिल्हा काेषागार कार्यालयाचे सहायक लेखाधिकारी पंकज खनके यांनी सेवापुस्तक अद्यावत व वेतन निश्चिती सेवार्थ याेजना बाबत विस्त्रूत माहिती दिली. याच आयोजित शिबिरात जिल्हा सुचना अधिकारी सतिश खडसे यांनी संगणकीय प्रणाली बाबत माहिती सांगितली.

रविवार दि.२१ नाेव्हेंबरला मूलचे एसडीआे महादेव खेडकर यांनी सकाळच्या सत्रात माहिती अधिकारी अधिनियम -२००५ बाबत मार्गदर्शन केले. या शिवाय चंद्रपूरचे सहायक जिल्हाधिकारी तथा एसडीआे राेहन घुगे व वराे-याचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी जमिन संकलीत विषयाबाबत सविस्तर माहिती या वेळी दिली. दुपारच्या सत्रात चंद्रपूरचे जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी गाैण खनिज बाबत, मूलचे तहसीलदार डॉ रविन्द्र हाेळी यांनी संजय गांधी निराधार व इत्तर याेजने बाबत मार्गदर्शन केले. याच आयोजित प्रशिक्षण शिबिरात चंद्रपूरच्या अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने तणाव मुक्त व्यवस्थापन बाबत माेलाचे मार्गदर्शन केले.

दाेन दिवशीय शिबिराला जिल्ह्यातील सर्व उपविभागाचे एसडीआे, तहसीलदार, नायब तहसीलदार, लिपिक वर्ग उपस्थित हाेते. दर वर्षी अश्या प्रकारचे प्रशिक्षण शिबिर उपविभागीय स्तरावर देखिल आयाेजित करण्याची अपेक्षा अनेक कर्मचारी बांधवांनी शिबिर आटाेपल्या नंतर व्यक्त केली.
  
चंद्रपूर येथे दोन दिवशीय महसूल कर्मचा-यांचे प्रशिक्षण शिबिर चंद्रपूर येथे दोन दिवशीय महसूल कर्मचा-यांचे प्रशिक्षण शिबिर Reviewed by सह्याद्री चौफेर on November 22, 2021 Rating: 5
Powered by Blogger.