सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक राेखण्यांसाठी तथा दंडात्मक कारवाया करण्यांसाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी व कर्मचा-यांनी कंबर कसली असून चंद्रपूरच्या अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शनाखाली भाैगिलिक माहिती प्रणाली सहायक अल्का खेडकर, खनिज निरीक्षक बंडु वरखेडे, व दिलीप माेडके यांनी नुकतेच मध्यरात्रीला अवैध रेतीची वाहतुक करणारे पाच वाहने पकडुन ती दंडात्मक कारवायासाठी जप्त केली आहे.
या पथकातील अधिकारी व कर्मचारी वर्गांनी स्वताच्या जिवाची पर्वा न करता रात्राै दाैरा करुन गुप्त व मिळालेल्या माहितीच्या आधारे अवैध रेतीचे वाहने पकडल्यामुळे रेती माफियात अक्षरशा खळबळ उडाली आहे. दरम्यान, अमाेल भाेंदे रा.नागपूर, कैलास सपाटे उमरेड जि. नागपूर,प्रतीक निदवानसा नागपूर, या शिवाय मधुकर मेश्राम अजयपूर (चंद्रपूर) यांच्या मालकीचे अवैध रेतीचे दाेन हायवा जप्त करण्यात आले असून, या सर्व अवैध रेती तस्करांवर खनिकर्म विभागाने बारा लाख सत्त्यातर हजार पाचशे रुपयांचा दंड आकारला अाहे.
उपराेक्त सर्व कारवाया सोमवार दि.२२ नाेव्हेंबर व मंगळवार दि.२३ नाेव्हेंबरच्या रात्राैला करण्यात आल्याचे समजते.
खनिकर्म भरारी पथकाने जिवाची पर्वा न करता केल्या मध्यरात्रीला धडक कारवाया
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 24, 2021
Rating:
