सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : नवोदित कवी व प्रतिभावंत कवींच्या कवितांना वाव मिळावा म्हणून राजू पाडेकर यांच्या प्रेरणेतून काव्यांगण लेखणी साहित्य मंचाची निर्मिती करण्यात आली. याच साहित्य मंचाच्या राष्ट्रीय सल्लागार पदावर गडचिराेलीच्या साहित्यिका कुसुमताई अलाम यांची निवड करण्यात आली तर, राष्ट्रीय संघटक म्हणून रवींद्र गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्यानेच नव्यांगण लेखणी साहित्य मंचच्या गडचिरोली जिल्हा शाखेची निर्मिती नुकतीच करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष अशोक मंदाडे, उपाध्यक्ष रजनी सलामे,पुरुषोत्तम ठाकरे (महासचिव), मारोती आरेवार (सचिव), महिला आघाडी प्रमुख पदी प्रतिक्षा कोडापे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सामाजिक व शैक्षणिक स्तरातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय राज्य अध्यक्ष कवि राजू पाडेकर व राज्य कार्याध्यक्ष प्रा.नीरज आत्राम यांना दिले.
काव्यांगण लेखणी साहित्य मंचच्या राष्ट्रीय सल्लागार पदी गडचिराेलीच्या कुसुमताई अलाम यांची नियुक्ती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 24, 2021
Rating:
