"त्या" नदी पात्रात एका अज्ञात इसमाचे आढळून आले प्रेत

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी : मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंप्रड गावाच्या नजीक असलेल्या पैनगंगा नदीच्या परसोडा घाटाजवळ (ता.२ नोव्हें.) ला एका अज्ञात इसमाचा मृतदेह सकाळी ११ वाजता च्या दरम्यान ये-जा करणाऱ्या नागरिकांना नदीच्या काठावरील पाण्यात तरंगताना आढळून आला. अज्ञात इसमाचा मृतदेह बघण्याकरिता नागरीकांची तोबा गर्दी उसळली होती.

या घटनेची माहिती ठाणेदार अजित जाधव यांना देण्यात आली. ठाणेदार आपल्या चमूला घटनास्थळी पाठवून मृतक कुठला व कोण आहे? याचा शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. 
या मृत्यूदेहाची नदी काठालगत असलेल्या गावात व पाटण पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग किंवा इतर तक्रारीबाबत माहिती घेण्यात आली. मात्र, अशी कोणतीही तक्रार नसल्याने सदर इसम हा तेलंगाणातून वाहत आल्याचा अंदाज  वर्तविण्यात आला असूनवाहून आलेला मृतदेह पाण्यात असल्याने पूर्णपणे फुगला होता. पोलीस कर्मचाऱ्यांनी अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाच्या जागेची पाहणी करून सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह झरी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदना करीता पाठवण्यात आला असून, सध्या तरी मृतदेहाची ओळख पटली नसल्याने या घटनेचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रंजना सोयाम करीत आहे.
"त्या" नदी पात्रात एका अज्ञात इसमाचे आढळून आले प्रेत "त्या" नदी पात्रात एका अज्ञात इसमाचे आढळून आले प्रेत Reviewed by सह्याद्री चौफेर on November 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.