"त्या" उर्मट व गुंड स्वभावाच्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करा- राजू कुडेंची मागणी


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३ ऑक्टो.) : गेल्या एकआठवड्या पूर्वी सेंटर फॉर डेवलॉपमेंट कम्युनिकेशन चंद्रपूर येथे कार्यरत असलेला कर्मचारी सचिन जीवने याला तेथील मॅनेजर अविनाश कोतपल्लीवार यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना आशीर्वाद सभागृह जवळील CDCC कार्यालयात घडली.

चंद्रपूरातील कचरा संकलन करण्याचे काम या CDCC कंपनीला मागील ५-६ वर्षापासून मिळालेले असून, तिथे कार्यरत अविनाश कोतपल्लीवार नावाचा संबधीत अधिकारी हा आपल्या कर्मचाऱ्यां सोबत क्रूरतेने वागत असल्याची तक्रार तेथील वाहन चालक, सुपर वायझर, हात ट्रॉली, व कामगार हे वारंवार करीत आले आहे. परंतु चंद्रपूर महानगरपालिका याकडे पुर्णता दुर्लक्ष करीत असल्याचे कामगार युनियन चे सदस्य यांनी म्हटले आहे. महानगर पालिका आणि CDCC या कंपनीच्या व्यवस्थापनाच्या या उदासीनते मुळे त्या क्रूर व्यक्तीचे (आपल्या) कर्मचाऱ्यांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाही. तेथील कार्यरत कर्मचारी सचिन जीवने या व्यक्तीला अश्लील शिवीगाळ करून त्याला अमानुषरित्या मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत ची तक्रार आम आदमी पार्टी चंद्रपूरचे शहर सचिव राजु कुडे यांना मिळाली. याची तात्काळ दखल घेत त्यांनी आपल्या टीम सोबत पिडीताला घेऊन रामनगर पोलीस स्टेशन गाठले व त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली. मनपा प्रशासनाने अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, जेणे करून भविष्यात अश्याप्रकारचे कृत्य करण्याची हिम्मत कुणीही करणार नाही. तसे एक निवेदन देखील मनपा प्रशासनाला आपच्या वतीने नुकतेच देण्यात आले आहे.
   
निवेदन देते वेळी आपचे शहर सचिव राजु कुडे, बाबुपेठ प्रभाग संयोजक निखिल बारसागडे, अश्रफ सय्यद, चंदु मादुरवार, सुरेन्द्र जीवने, महेश गुरूनुले, प्रकाश जुमडे,जयदेव देवगडे, प्रवीण चुनारकार, शैलेश सोनकुसरे, सचिन जीवने, अंकुश राजूरकर, शंकर निखाडे,जयंत थूल, राजेश चेडगुलवार, कालिदास ओरके, सुखदेव दारूंडे, सुजाता बोदेले, ऐश्वर्या वासनिक, अंजू रामटेके, आदीं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
"त्या" उर्मट व गुंड स्वभावाच्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करा- राजू कुडेंची मागणी "त्या" उर्मट व गुंड स्वभावाच्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करा- राजू कुडेंची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on October 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.