सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२ आक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड नगर परिषदेला काल दि.१ आक्टोबर सफाई कामगारांनी घेराव टाकल्याचे वृत्त आहे.
आपल्या रास्त मागण्यांसाठी त्यांनी ऐनवेळी हे आंदोलन पुकारले असल्याचे बाेलल्या जाते. या आंदाेलनात ४० ते ४५ सफाई कामगार सहभागी झाल्याचे प्रहारचे नागभिड सेवक वृक्षभ खापर्डे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना आज सांगितले.
सकाळी ८ वाजे पासून सुरु झालेले हे आंदोलन दुपारी ४ वाजेपर्यंत चालले असल्याचे समजते. महाभयानक काेविड परिस्थितीत जिव धाेक्यात टाकुन सफाई कामगारांनी सफाईचे काम इमाने इकबारे केले आहे. परंतु आताच्या घडीला तेथील ठेकेदार म्हणताे की मी म्हणील तेवढी राेजी आपणांस घ्यावी लागेल. ही बाब चक्क कामगारांनी नाकारली असल्याचे खापर्डे यांनी सांगितले. त्यांचे वेतनावरुन हा वाद सुरु असल्याचे सर्वत्र बाेलल्या जाते.