Top News

वनविभाग व मोघे कॉलेज तर्फे राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह प्रारंभ


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२ आक्टो.) : पांढरकवडा शहरातील मोघे कॉलेज येथे राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह प्रारंभ करण्यात आला. संपूर्ण भारतात १९५२ या कालावधी पासून राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह सुरुवात करण्यात आली याच अनुषंगाने मोघे कॉलेज येथे २ ऑक्टोबर रोजी वनविभाग अधिकारी व पत्रकार, प्राचार्य यांनी उपस्थित दर्शविली.तसेच कार्यक्रमाचे आयोजक रमजान विराणी (वन्यजीव- मानव संरक्षक) यांनी २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहेत. 2 ऑक्टोंबर रोजी मोघे कॉलेज येथे वन्यजीव सप्ताह कार्यशाळा घेऊन मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष कशाप्रकारे कमी करता येईल, जंगल तोड व पशुपक्षी आदिवासावर मानवाकडून होत असलेल्या आक्रमण, यासाठी कशाप्रकारे उपाय योजना करून मानव व वन्यजीव संघर्ष कशाप्रकारे कमी करता येईल याची चर्चा कार्यक्रमात करण्यात आली.

 कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्य, रमजान विराणी (वन्यजीव व मानव संरक्षक) अध्यक्ष, सहाय्यक उपवनसंरक्षक अग्रिम सेनु टिपेश्वर, सुभाष डुमाने, वनाधिकारी विजय तळणीकर, रवींद्र कोंडावार, नरेश मानकर, दामू बाजोरिया, यांनी कार्यक्रम उपस्थिती दर्शविली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता प्राचार्य, रमजान विराणी, वंजारी, मडावी, यांनी केले.
Previous Post Next Post