बोरी (गदाजी) येथे अदामा कंपनी च्या वतीने शेतकरी चर्चासत्र व फवारणी किट वाटप


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२ आक्टो.) : मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी) या गावामध्ये दि. १ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता श्री संत गदाजी महाराज मंदिर मध्ये अदामा इंडीया या कंपनीचा शेती विषयक चर्चासत्र पार पडले.

या कार्यक्रमात गावातील शेतकरी यांनी चांगला प्रतिसाद दिला,  या कार्यक्रम मध्ये कंपनीचे मार्केटिंग डेवलपमेंट मॅनेजर श्याम तुरणकर सर यांनी शेतकरी यांना कंपनी बद्दल व कंपनीच्या नविन उत्पादन बद्दल माहीती दिली. तसेच रीजनल मॅनेजर विवेक नाखले सर यांनी कपासी या पिकाबद्ल व येणारी किडी वर कसा मात करायचा या वर मार्गदर्शन केले. व  कार्यक्रमाची सांगता उपस्थित शेतकऱ्यांना फवारणी किट देऊन करण्यात आली.

या वेळी कंपनी च्या वतीने टेरीटरी मॅनेजर रविंद्र इंगळे सर, निलेश उडाखे, पंकज भोयर व सागर परडखे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
Previous Post Next Post