सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२ आक्टो.) : अल्पवयीन मुलींच्या नकळतेपणाचा फायदा घेऊन त्यांना आमिषे प्रलोभने देऊन त्यांना आपल्या जाळ्यात ओढलं जात आहे. या अल्पवयीन मुलींचा काही टार्गट तरुणांकडून गैरफायदा घेतला जात असून अल्पवयीनांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना बऱ्याच वाढल्या आहेत. असाह्य व गरिब घरच्या मुलींवर डोळा ठेऊन त्यांना भाळण्याकरिता ही टार्गट मुलं मजनू बनून त्यांच्या मागे फिरतात. त्यांच्यावर खोट्या प्रेमाचा वर्षाव करतात. मुलगी प्रेम पाशात अडकली की, तिला फूस लावून पळवून येऊन तिचा गैर फायदा घेतात. मागील काही दिवसांत अल्पवयीन मुलींवर अत्याचार, मुलींची छेडखाणी, विनयभंग व फूस लावून पळवून नेल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी एका अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. टार्गट तरुणांकडून अल्पवयीन मुलींना टार्गेट करण्याचे प्रकार चांगलेच वाढीस लागले आहेत. शहरातील एकता नगर येथे आपल्या आजी सोबत राहणारी अल्पवयीन मुलगी काल १ ऑक्टोबरच्या रात्री दरम्यान अचानक घरून बेपत्ता झाली. पहाटे ३.३० वाजता आजीचा डोळा उघडल्यानंतर घरात झोपलेली नात आजीला दिसून न आल्याने आजी चांगलीच घाबरली. आजीने नातीला जेवढे शोधाता येते, तेवढे शोधण्याचा प्रयत्न केला. ओळखीतल्या व्यक्तींनाही विचारपूस केली. पण तिचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. शेवटी आजीने पोलिस स्टेशनला येऊन नात घरून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. मुलीला आई वडील नसल्याने ही मुलगी एकता नगर येथे आपल्या आजीकडेच रहात होती. १० नापास असलेली ही मुलगी १७ वर्ष वयोगटातील असल्याचे सांगण्यात येते. तिला कुणी अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याचा संशय आजीने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून व्यक्त केला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादंवि च्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुलीचे शोधकार्य सुरु केले आहे.
पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.
अल्पवयीन मुलींवरिल अत्याचाराचे गुन्हे वाढले, शहरातील आणखी एक अल्पवयीन मुलगी झाली बेपत्ता
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 02, 2021
Rating:
