अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर गंभीर जखमी

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (१५ ऑक्टो.) : तालुक्यातील नरसाळा येथील युवक केळापूर देव दर्शन करून परतीचा प्रवास करत असताना कोठोडा जवळील पुला जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला तर, एक गंभीर जखमी झाला आहे. काल मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

या भीषण अपघातात शंकर बाळू माहुरे (२१) रा. नरसाळा हा जागीच ठार झाला तर, राहुल मेश्राम (२५) रा.सखी किसनपुर ता. राळेगाव हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

सूत्राच्या माहितीनुसार, शंकर व राहुल हे दोघेही  गुरुवारी सांयकाळी केळापुर येथील देवीचे दर्शनासाठी गेले होते. दोघांनी देव दर्शन घेतले आणि आपल्या गावाकडे परत निघाले असतांना मध्यरात्री १ वाजताच्या दरम्यान, राज्य महामार्गावर कोठोडा नजीक अज्ञात वाहनाने दुचाकी क्रमांक (एमएच २९ एन ८०६२) ला जोरदार धडक दिल्याने शंकर बाळू माहुरे हा जागीच ठार झाला तर राहुल मेश्राम गंभीर जखमी झाला आहे. 
 (मृतक शंकर माहुरे)         (जखमी राहुल मेश्राम)

जखमीला करंजी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने राहुल याला यवतमाळ ला रवाना करण्यात आले असे समजते. 

घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा पोलीस आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते.
पुढील तपास पांढरकवडा पोलीस करत आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर गंभीर जखमी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर गंभीर जखमी Reviewed by सह्याद्री चौफेर on October 15, 2021 Rating: 5
Powered by Blogger.