टॉप बातम्या

जगदंबा संस्थानात नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (४ ऑक्टो.) :  संपूर्ण महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध पावलेले येथील माँ जगदंबा संस्थानात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून रंगरंगोटीसह सजावटीचे काम अखेरच्या टण्यात आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर आंध्रप्रदेश व इतरही राज्यातून दरवर्षी नवरात्र महोत्सवात हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. नऊ दिवस या ठिकाणी चैतन्याचे वातावरण असते. भक्ता कडून दर वर्षी मोठ्या प्रमाणात अखंड ज्योत लावण्यात येतात.
घटस्थापनेच्या दिवशी संस्थानचे अध्यक्ष शंकरराव बडे यांच्या निवासस्थानाचर वाजतगाजत भक्तीमय वातावरणात देवीची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक देवस्थानात पोहचल्यानंतर तेथे देवीची स्थापना केली जाते. त्यानंतर पुढील नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे येथे आयोजन केले जाते. मंदिरावर केलेल्या नेत्रदीपक रोषणाईने सारा परिसर उजळून निघणार आहे. या ठिकाणी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. या ठिकाणी नऊ दिवस यात्रेचे स्वरूप आलेले असते मंदिराच्या सजावटीचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे.
संपूर्ण महोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष शंकर बडे सचिव चंदु पाटील पोलाडीवार उपाध्यक्ष काशिनाथ शिंदे, प्रेमराव वखरे पाटील, दीपकअण्णा कापर्तीचार,वामनराव सिडाम, अण्णासाहेब पारवेकर विश्वस्त आणि सरपंच सुरेश अनमुलवार उपसरपंच विलास (बालू ) गोहणे पोलीस पाटील  जिवितारानी पडलवार हे परिश्रम घेत आहेत. 
Previous Post Next Post