वीज अंगावर कोसळल्याने मृत्यू झालेल्या अनिकेतच्या कुटुंबीयांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आर्थिक मदत
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (४ ऑक्टो.) : केबलचे काम करत असतांना भर दुपारी अंगावर विज कोसळल्याने मृत्यु झालेल्या २२ वर्षीय अनिकेत चांदेकर यांच्या कुटुंबीयांची आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेतली असून त्यांना आर्थिक मदत केली आहे. तसेच सदरहु पिडीत कुटुंबीयांना शासनातर्फे चार लक्ष रुपयांची मदत लवकरच मिळवून देण्याचे आश्वासन आमदार जोरगेवार यांनी दिले आहे.
बाबुपेठ येथे भाड्याच्या खोलीत राहणारा अनिकेत हा शहरात केबल टाकण्याचे काम करत होता. घटनेच्या दिवशी शहरात ढगाळ वातावरण होते. या दरम्यान त्याच्या अंगावर विज कोसळली यात त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच आमदार जोरगेवार यांनी अनिकेतच्या घरी जात त्याच्या कुटुबीयांची भेट घेत सांत्वन केले. तसेच यावेळी त्यांनी सदरहु पिडीत कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. शासनातर्फे मिळणारी आर्थिक मदतही लवकर मिळावी याकरिता आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे. तसेच आकाशात विजांचा गडगडाट होत असतांना नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.
मृतक सुरेंद्र देवाडकर यांच्या कुंटुबियांची भेट घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आर्थिक मदत
येथील बाबुपेठ येथील रहिवासी ४५ वर्षीय सुरेंद्र देवाडकर यांचा वनरक्षकाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप केल्या जात आहे. दरम्यान काल रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी सुरेंद्रच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या सायली येरणे, माधूरी निवलकर, अल्का मेश्राम, निलीमा वनकर यांची उपस्थिती होती.
सरपण आणण्यासाठी जंगलात गेले असता, सुरेंद्रला वनरक्षकाने मारहाण केली यात त्यांचा मृत्यू झाला. असा आरोप सुरेंद्रच्या नातलगांनी केला आहे. काल रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतक सुरेंद्र देवाडकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सदर कुटुंबीयांना आमदार किशोर जोरगेवार यांनी आर्थिक मदत केली. तसेच यावेळी सदर कुटुंबीयांचा खंडीत करण्यात आलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठीही आ. जोरगेवार यांनी आर्थिक मदत केली.
वीज अंगावर कोसळल्याने मृत्यू झालेल्या अनिकेतच्या कुटुंबीयांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आर्थिक मदत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 04, 2021
Rating:
