सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (१३ ऑक्ट.) : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन तसेच नवरात्रोत्सावाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन उद्या १४ ऑक्टोबर २०२१ रोजी गुरुवार ला कासारबेहाळ येथे करण्यात आले आहे.
महागांव तालुक्यातील कासारबेहळ येथील वाघाई माता मंदिरात नवरात्रोत्सावानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.१४ ऑक्टोबर ला वाघाई माता मित्र मंडळ, महानायक वसंतराव नाईक प्रतिष्ठान सेवानगर, कासारबेहळ यांच्या यांच्या वतीने आयोजन करण्यात आले असून, रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये मोठया संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गोपाल कर्हे, आशुतोष कर्हे, सचिन जाधव यांनी केले आहे.
कासारबेहळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 13, 2021
Rating:
