दारूच्या नशेत पैशाच्या वादावरुन मुलाने केला बापाचा खून


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
पुसद, (१३ ऑक्टो.) : तालुक्यातील माळ पठारावरील खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अमृत नगर येथील एका ३५ वर्षीय इसमाने दारूच्या नशेत पैशाच्या वादावरून जन्मदेत्या बापाचा खून केला.
   
पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत अमृतनगर येथील अनिल मारोती गादेकर (३५) हा, शेतातील सोयाबीन विक्री करून दिनांक १२ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी घरी आला. त्यावेळी अनिल चे वडील मारोती तुकाराम गादेकर (६२) यांनी अनिल ला लोकांचे उधार घेतलेले पैसे परत द्यायचे आहेत तू पैसे दे असे म्हणताच अनिल ने जन्मदात्या वडीलांच्या डोक्यात राञी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान वखराची पास घालून दारूच्या नशेत जागीच खून केला.तसेच घरातील मंडळींना धमकावून सांगितले की,तुम्ही पोलिसांना सांगसाल तर तुमची ही अशीच गत करेन.घरातील ऐकून गावातील नागरिक जमा झाले. अंधाराचा फायदा घेत अनिल जंगलात पळून गेला तक्रारीवरून खंडाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार बालाजी शेंगेपल्लू रात्रीलाच तपासाची चक्रे फिरवून वसंत नगर पुसद पोलिस स्टेशन च्या सहकार्याने,आरोपी अनिल ला सावरगाव बंगला येथे अटक केली.

उत्तरीय तपासणीनंतर दिनांक १४ ऑक्टोंबर रोजीमृतक मारुती गादेकर यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून आरोपी अनिल याला पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दारूच्या नशेत पैशाच्या वादावरुन मुलाने केला बापाचा खून दारूच्या नशेत पैशाच्या वादावरुन मुलाने केला बापाचा खून Reviewed by सह्याद्री चौफेर on October 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.