नेहरू युवा केंद्र, यवतमाळ अंतर्गत,जगदंबा संस्थान केळापूर येथे स्वछता अभियान


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१७ ऑक्टो.) : नवरात्री उत्सवानिमित्याने भाविकभक्त जगदंबा संस्थान केळापूर, येथे मोठया संख्येने माँ जगदंबेच्या दर्शनासाठी उपस्थिती दर्शविली. नागरीक ९ दिवस मोठया संख्येने असल्यामुळे जगदंबा संस्थानाच्या परिसरात जिकडे तिकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्या अनुषंगाने नेहरू युवा केंद्र यवतमाळ अंतर्गत दि.१७/१०/२०२१ रोजी जगदंबा संस्थान केळापूर येथे सहभागी ब्लॉक पांढरकवडाच्या वतीने स्वच्छ भारत (क्लीन इंडिया) कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
                     
देशात प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे नुकसान लक्षात घेता खेळ मंत्रालयाद्वारे संपुर्ण देशात प्लास्टिक कचरा जमा करण्याचे अभियान राबविले जात आहे. त्याच अनुषंगाने नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या वतीने जगदंबा संस्थान केळापूर येथे आज प्लास्टिक व केर कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली.

स्वच्छता अभियान कार्यक्रमात नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक पांढरकवडा विशाल दुबे, सलमान खान, गुरुबच्चन सिंग, नितेश चव्हान, सागर गुरनुले, राहुल चांदेकर, रोहन केळापूरे, विशाल मेश्राम, अक्षय सिडाम, सुशील मिसाल व शाहिद भगतसिंग क्रीडा मंडळचे खेळाडू कार्यक्रमात सहभागी झाले.
नेहरू युवा केंद्र, यवतमाळ अंतर्गत,जगदंबा संस्थान केळापूर येथे स्वछता अभियान नेहरू युवा केंद्र, यवतमाळ अंतर्गत,जगदंबा संस्थान केळापूर येथे स्वछता अभियान Reviewed by सह्याद्री चौफेर on October 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.