काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांच वऱ्हाड दुबईत; ओल्या दुष्काळात शेतकरी बांधावर संकटात असतांना नेत्यांच्या डोक्यात क्रिकेटचे खूळ
सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
यवतमाळ (२५ ऑक्टो.) : दुबई येथे सुरू असलेल्या टी ट्वेन्टी स्पर्धेकडे आशिया खंडातील लोकांचे लक्ष लागले आहे. परंतु, यवतमाळ जिल्ह्यासाठी धक्का दायक माहिती सोशल मीडिया च्या व्हायरल फोटो च्या माध्यमातून समोर आली आहे.दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकनियुक्त आमदार इंद्रनील नाईक आणि काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार वजाहात मिर्झा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता दुबईत जाणे पसंत केले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी मदत मिळण्याची याचना करत आहे. त्यांच्या पाठिशी उभे राहण्याची अपेक्षा आमदारांकडून व्यक्त केली जात असताना बांधावर न जाणारे, आमदार थेट दुबईला पोहचून क्रिकेटचा आनंद लुटत आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांविरुद्ध पुसद विधानसभा मतदार संघात शेतकऱ्यांकडून चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांचे वऱ्हाड दुबईत पोहोचलले आहे. चालू खरीप 2021-22 हंगामामध्ये ओला दुष्काळ व अतिवृष्टीने महापुरा मध्ये शेती व शेतमालाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाल्याने होत्याचे नव्हते झाले शेतकऱ्यांच्या शेतातील महापूर तर ओसरला पण डोळ्यातले अश्रू अजून कायम आहे असं शेतकरी संकटात असताना नेत्यांच्या डोक्यात मात्र क्रिकेटचे खूळ घुसल्याने संताप व्यक्त होत आहे...!
शेती ही उद्योगाची जननी असून या देशाची आर्थिक समृद्धीची क्षमता केवळ कृषी उद्योगातच आहे शेतकरी हा 'कारखानदार' व्हावा अशी महत्वकांक्षा उराशी बाळगून शेतकरी व शेती केंद्रबिंदू स्थानी ठेवून धोरण राबविणारे हरित क्रांतीचे प्रणेते शेतकऱ्यांचे आराध्यदैवत स्व. वसंतराव नाईक यांची दूरदृष्टीचे विचार राज्यकर्त्यांनी आज आत्मसात करणे क्रमप्राप्त असतांना गत दोन वर्षापासून कोरोना, covid-19 सारख्या विषाणूजन्य संसर्ग रोगाच्या प्रादुर्भावा मध्ये व अतिवृष्टी ओला दुष्काळाने हाहाकार जिल्ह्यामध्ये उडालेला आहे. शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या करत आहे असं असताना अशा निराशेचा प्रतिकूल परिस्थितीत आर्थिक दृष्ट्या हतबल आर्थिक विवंचनेत उद्ध्वस्त व हताश असलेल्या शेतकऱ्यांना मानसिक धीर देऊन शासन दरबारी प्रयत्नांची पराकाष्ठा करून दबावतंत्र निर्माण करून सत्ताधारी आमदार म्हणून त्यांना भरीव आर्थिक मदत जिल्ह्यास प्राप्त करून देणे त्यांच आर्थिक उत्कर्ष व उत्थान करून त्यांना उभ राहण्याचं बळ देणं, यांची नैतिक जबाबदारी ही स्थानिक प्रस्थापित नेत्यांची असते असं असतांना या दुष्काळात होरपळणाऱ्या पीडित शेतकऱ्यांना दुष्काळात वाऱ्यावर सोडून त्यांच्याप्रती अनास्था बाळगून विदेशात जाऊन क्रिकेट पाहणाऱ्या या आमदारांना वसंतराव नाईक साहेबांच्या विचाराचा वारसा लाभलेल्या नेतृत्वाकडून राज्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांनी काय अपेक्षा ठेवाव्यात असा यक्षप्रश्न आता पुसद विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलेला आहे.
दुर्दैवाने आज कै वसंतराव नाईक साहेबांच्या विचारांचा सामाजिक बांधिलकीचा वारसा घेऊन चालवणाऱ्या त्यांच्या तिसऱ्या पिढीतील नेतृत्वाला त्यांच्या विचारांचा विसर पडलेला दिसतोय,
नव्या दमाच्या युवा पिढीतील या लोकनियुक्त नवनिर्वाचित आमदार इंद्रनील नाईक व उच्च विभूषित डॉ वसाहत मिर्झा या आमदाराकडून जिल्ह्यासह पुसद विधानसभा मतदारसंघातील मतदात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या नेतृत्वाची कसब लावून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम, व्हावं यासाठी विधायक कार्य त्यांच्याकडून अभिप्रेत होते पण, दुर्दैवाने पुसद विधानसभा मतदार संघ हे विकासात्मक बाबी साठी समस्याग्रस्त होऊन समस्येचे माहेरघर बनले मूलभूत पाया उभारणी विकासात्मक कामाचा प्रचंड अनुशेषाचा अभाव या पुसद शहरात आढळून येतो, सहकार क्षेत्राला लागलेली अखेरची घरघर, बेरोजगारी, पी एन कॉलेज, ते बी एन कॉलेज रस्ता खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे रस्ते विकास यामध्ये निष्पाप लोकांचा आज बळी जात आहे.
प्रशासनाची क्रयशक्ती वर यांचे नियंत्रण नसल्यामुळे उन्माद खोर अधिकाऱ्यांची मुजोरी प्रशासनात वाढलेली आहे पुसद विधानसभा मतदारसंघात अनेक महसुली मंडळ या दुष्काळी मदतीपासून वंचित आहे दिवाळी पूर्व पिक विमा मध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश नाही याची नैतिक जबाबदारी बोथट व बेभान सैराट झालेली ही नेते मंडळी घेणार की बोथट झालेली यंत्रणा घेणार हाच प्रश्न आहे कुठलेही नियंत्रण नसल्यासारखे झाले जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड नैराश्याच्या गर्तेत सापडून दररोज शेतकरी आत्महत्या करतोय दिवाळी सारखा मोठा सण तोंडावर असताना, हा सण कसा साजरा करावा, भारनियमन मुक्त करणारे अजित दादा यांच्या महा विकास आघाडी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावर सक्तीने वीज बिल वसुली करणे चालू असून ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल अदा करण्यास सक्षम नाही अशा शेतकऱ्यांच्या वीज तोडणी चालू आहे.
पुसद विधानसभा मतदारसंघातील 60 टक्के लोक, ही दिवाळीपूर्वी ऊसतोडीसाठी दररोज पर जिल्ह्यात पर प्रांतात स्थलांतरित होत आहे. याचं पाप हे स्थानिक नेतृत्वाच असून, गत पंचवीस वर्षापासून विकास कामांमध्ये माघारलेला पुसद विधानसभा मतदार संघाची झिज कधी व कशी भरून निघणार कारण विकास कामाबाबत सामान्य जनतेतील आर्तहाके प्रश्नच तेवढे प्रलंबित व सत्ताधाऱ्यांकडून अनुत्तरीत आहे. विकासाच्या विधायक व रचनात्मक कामासाठी त्रस्त आहे, समाजाच्या मतदानावर व स्व वसंतराव नाईक व स्व सुधाकरराव नाईक साहेबांच्या पुण्याईवर आत्तापर्यंत सत्तेत असणार्या प्रस्थापितांना आत्मचिंतन करायला लावणारा विषय आहे.
या समोर समाजाला गृहीत धरून राजकीय समीकरण लावणे कदाचित सोयीचे होणार नाही कारण समाज प्रगल्भ होत चाललेला आहे व शेतकऱ्यांना निरपेक्ष न्याय मिळत नसल्यामुळे युवा शेतकऱ्यांमध्ये मोठी जनजागृती झालेली आहे. या समोरच्या कालखंडात होणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा आमदारांना दारावर शेतकऱ्यांनी उभं करू नये यांना शेतकऱ्यांच्या बद्दल "ब्र" शब्द काढण्याचा अधिकार गमावलेला आहे.
आता पुसद विधानसभा मतदार संघातील जनतेने आत्म चिंतनाने जात, धर्म, पंथ, पक्षीय भेद बाजूला ठेवून या पुसद विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाकरिता योग्य व नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं कळकळीचं आवाहन मी या निमित्ताने या घटनेच्या अनुरूप करतो.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांच वऱ्हाड दुबईत; ओल्या दुष्काळात शेतकरी बांधावर संकटात असतांना नेत्यांच्या डोक्यात क्रिकेटचे खूळ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 25, 2021
Rating:
