सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
बिलोली, (२५ ऑक्टो.) : महाराष्ट्र राज्यातील गाव दानापुर (जिल्हा अमरावती) येथे गावातील गावगुडांच्या जातीय अत्याचाराला कंटाळून अनुसूचित जातीच्या समाजाला गाव सोडावे लागल्याची घटना घडली आहे.
अनुसूचित जातीच्या बांधवांच्या शेतात जाणारा रस्ता गावगुडांनी अडवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनुसूचित जातीच्या समाजाला आर्थिक नुकसान पोहचवण्याचा तसेच त्यांना शेती विकण्यास मजबूर करण्याचा हा प्रकार दिसत आहे. तरी ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष किरण फुगारे यांनी एका निवेदनाद्वारे राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगास या प्रकरणात प्रामुख्याने लक्ष घालून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच पिडीतांना अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ अन्वये अर्थसहाय्य करण्याच्या सुचना सबंधित प्रशासनास देण्याचे आवाहन केले आहे.
देशातील संविधानिक संस्थांनी आपली कायदेशीर भुमिका चोखपणे पार पाडणे फार गरजेचे आहे परंतु अनुसूचित जातीवरील अत्याचारांच्या प्रकरणात पोलिस प्रशासनाची भुमिका दिवसेंदिवस संशयास्पद होत चालली आहे. त्यामुळे घटनात्मक दर्जा असलेल्या राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाकडुन समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत असे मत जिल्हाध्यक्ष किरण फुगारे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
दानापुर अनुसूचित जातीवरील अत्याचार प्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 25, 2021
Rating:
