सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (२५ ऑक्टो.) : महागांव तालुक्यातील करंजखेड शिवारात बिबट्याने येथीलच युवती नामे वृषाली निळकंठ ठाकरे (१८) हिच्या वर हल्ला केला. या हल्यात युवती गंभीर जखमी झाल्याचे समजते. ही घटना ११ च्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार युवती गावातील महिला सोबत आपल्या शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. अशातच नाल्याच्या बाजुस असलेल्या विहिरीचे पाणी आणण्यासाठी युवती गेली असता, आधीच दबा धरून बसलेल्या बिबट्याने वृषालीवर अचानक अंगावर हल्ला केला. युवतीने आपला जिव वाचवण्यासाठी हातात असलेल्या गुंडाने बिबट्यावर वार केला असता, बिबट्या मागे सरकला आणि तिच्या वर एकदम हल्ला चढवला केला. दरम्यान, मुलीने बिबट्याला गुंड फेकुन मारल्याने बिथरलेल्या बिबट्याने मुलीस जखडून धरले असतांना युवतीने जोरजोरात आरडाओरड केल्या नंतर शेतातील मंजुरांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. लोकांचा कल्ला ऐकूण बिबट्या घटनास्थळावरून पळाला. मात्र, मुलीने प्रसंगावधान दाखवत आरडाओरडा केल्याने वेळीच मंजुर धावून आले. त्यामुळे बिबट्याचा जबड्यातुन युवतीची सुटका झाली.
"या घटनेच्या अगोदर एका म्हशी च्या वासरावर या बिबट्याने हल्ला करुन जिवे मारण्याची घटना घडली होती. त्याचा पंचनामा होत असतांना हि दुसरी घटना घडली असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते."
बिबट्याने युवतीला जखमी केले असता जखमी
अवस्थेत मुलीला शेतात कामाला असलेल्या मंजुराने गावातील नागरिकांना कळविण्यात आले. जखमी अवस्थेत प्रविण ठाकरे, संदिप ठाकरे यांनी तातडीने उपचारासाठी सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या युवतीचे लचके तोंडल्याने शिवाय करंजखेड परीसरात एकाच दिवशी दोन घटना घडल्याने परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. हजारो संख्येची लोकवस्ती असुन या वस्तीला लागूनच डोंगराळ भाग असून या बिबट्याच्या हल्लाने येथील नागरिक दहशतीखाली आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वन अधिकारी उबाळे यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन परीस्थिती चा आढावा घेत, येथील नागरिकांना व शेतमंजुराना शेतात न जाता आपापल्या घरी थाबण्याचे सांगितले.
करंजखेड परीसरात बिबट्याने दहशत निर्माण केली असून वनविभागाने या बिबट्याच्या बंदोबस्त करून जखमी मुलीला वन विभागाने मदत करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
कापूस वेचण्यासाठी गेलेल्या युवतीवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 25, 2021
Rating:
