निवडणूक लढविण्यासाठी शैक्षणिक पात्रता असावी- डॉ. राजन माकणीकर

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मुंबई, (२5 ऑक्टो.) :  "देशातील कोणत्याही निवडणुकीत सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता असावी असा मनोदय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला आहे."

शैक्षणीक पात्रता असलेल्या किंमान दहावी उत्तीर्ण व्यक्तीला ग्राम पंचायत, नगरपालिका, महानगर पालिका साठी ग्राह्य उमेदवार समजावा तर बारावी उत्तीर्ण व्यक्तीला विधानसभा तसेच कोणत्याही पदवीप्राप्त व्यक्तीला लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात यावी व या अटी संबंध भारतात लागू कराव्यात.

2 अपत्यांची जी अट आहे ती स्वागतार्ह आहे मात्र, राजकारणातली गुणवत्ता सुधारून सुशिक्षित समाज घडवून आणण्यासाठी निवडणूक आयोगाने शिक्षणाची अट उमेदवारांसाठी ठेवण्यात यावी अशी मागणी डॉ. राजन माकणीकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या माध्यमातून केली आहे.
सदर प्रकरणी निवडणूक आयोगाने लवकर निर्णय नाही घेतल्यास कायदेविषयक विभाग महाराष्ट्र राज्य प्रमुख विधिज्ञ नितीन माने यांच्या मार्फतीने मा. न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली.
निवडणूक लढविण्यासाठी शैक्षणिक पात्रता असावी- डॉ. राजन माकणीकर निवडणूक लढविण्यासाठी शैक्षणिक पात्रता असावी- डॉ. राजन माकणीकर Reviewed by सह्याद्री चौफेर on October 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.