सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२ आक्टो.) : आदमी पार्टी चंद्रपूर तर्फ़े आज शनिवार दि. २ ऑक्टोबरला सकाळी 11:30 वाजता स्थानिक जटपुरा गेट तसेच गांधी चौक येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांचा प्रतिमेला माल्यार्पण करुन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनिल देवराव मुसळे, भिवराज सोनी, युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, आप पदाधिकारी प्रतिक विराणी ,शहर सचिव राजु कुडे , राजेश चेडगुलवार ,बबन क्रीश्नपल्लीवार , अजय डुकरे ,शाम वांढरे ,दिलीप तेलंग,राजेश पोटे ,करण अतकरे,निखील बारसागडे ,मारोती धकाते तथा इत्तर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.