टॉप बातम्या

मार्डी येथे शिक्षण परिषदेचे थाटात आयोजन

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव, (२ आक्टो.) : मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मार्डी येथे मारडी केंद्राची पहिली शिक्षण परिषद उत्सहात पार पडली.

शिक्षण परिषदेत मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणधिकारी माध्यमिक, शिक्षणधिकारी प्राथमिक, डायट प्राचार्य पांचाळ यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. तसेच गणित शिक्षणाचे पैलू, कोविड काळातील नावीन्यपूर्ण उपक्रम, राज्यस्तरीय सुरु असलेल्या शैक्षणिक उपक्रमाचा आढावा घेऊन विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

शिक्षण परिषदेच्या उदघाट्न प्रसंगी गट शिक्षणअधिकारी शेख लुकमान यांनी शिक्षण विषयक सद्परिस्थिती, कोविड नियमांचे पालन, करून शाळा सुरु करणे, अध्यापणाने मिळणारे आत्मिक समाधान तसेच अध्यापणाबाबत उपस्थितीत शिक्षकांना उदघाट्नीय भाषणातून प्रोत्साहित केले.

शिक्षण परिषदेचे उदघाटक गट शिक्षणअधिकारी शेख लुकमान तर अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा माढरे ताई ह्या उपस्थित होत्या. केंद्रप्रमुख ताटेवार सर, बिआरसीचे आशिष चव्हाण, निलेश आत्राम, यांची विशेष उपस्थिती होती.

शिक्षण परिषदेचे संचालन माधुरी लोहकरे मॅडम, प्रास्ताविक ताटेवार सर तर तुराणकर सर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पावडे सर, तुराणकर व खेवले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
Previous Post Next Post