चिमूर रस्ता अपघातात आईचा मृत्यू तर पुत्र बचावला


सह्याद्री न्यूज |  किरण घाटे 
चंद्रपूर, (२ आक्टो.) : चिमूर येथे काल झालेल्या रस्ता अपघातात आईचा मृत्यू झाल्याची दुखदायक घटना घडली, तर याच अपघातात पुत्र किरकाेळ जखमी झाला. सकाळी टँकर व दुचाकीत हा अपघात झाला असुन त्यात ६४ वर्षीय सुमन जाेंधुळकर गतप्राण झाली तर, तिचा मुलगा मधुकर हा किरकाेळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

या अपघाताची स्थानिक चिमूर पाेलिस स्टेशनचे पाेलिस अधिक चाैकशी करीत आहे.