लखीमपुर खीरी उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येविरोधात राष्ट्रीय किसान मोर्चा महागाव द्वारा तहसिलदार यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन
सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (६ ऑक्टो.) : उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खिरी येथे आंदोलन करीत असलेल्या शेतक-यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने भरधाव गाडी चालवत गाडीखाली चिरडुन सहा शेतक-यांची हत्या केली.
या हृदय पिळवटून टाकणा-या घटनेवर महामहीम राज्यपाल यांनी उत्तर प्रदेश सरकारला तात्काळ बरखास्त कराव, संवेदनहिन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना मंत्रीमंडळातुन बरखास्त करून शेतक-यांच्या हत्या करणा-या त्यांच्या मुलावर सामुहिक नरसंहारची केस दाखल करुन कठोर कारवाई करण्यात यावी आणि सर्व मृत शेतक-यांच्या परिवाराला 5.5 करोड क्षतिपुर्ती राशी देण्यात यावी व परिवारातील सदस्याला सरकारी नौकरी देण्यात यावी, अन्यथा राष्ट्रीय किसान मोर्चा द्वारा तीव्र स्वरुपात भारत बंद आंदोलन करण्यात येईल. या मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान मोर्चा युनिट महागाव तर्फे तहसिलदार साहेबामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे महागाव तालुकाध्यक्ष प्रमोदभाऊ जाधव, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ नगारे, भारतिय विद्यार्थी मोर्चा तालुकाध्यक्ष जयशील कुमार, भारतिय युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय बनसोडे, छत्रपती क्रांती सेना तालुकाध्यक्ष रमेशभाऊ नलावडे, भारतिय बेरोजगार मोर्चा तालुकाध्यक्ष राहुलकुमार गायकवाड, अरविंद भगत, भिमराव पाईकराव, भिमराव लोखंडे, सुनिल भोने, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
लखीमपुर खीरी उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येविरोधात राष्ट्रीय किसान मोर्चा महागाव द्वारा तहसिलदार यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 06, 2021
Rating:
