शेतकऱ्यांना दिलासा;अतिवृष्टी क्षेत्रात नुकसान भरपाई देण्यास सरकार सज्ज


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (२३ ऑक्टो.) : पावसाच्या अती लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे अथोनाथ नुकसान झाले. मातीत राबणाऱ्या बळीराजाच्या कष्टाला अपयश पदरी आलेलं दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जून ते ऑक्टोबर २०२१ मध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच राज्यात विविध जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतीपिकांची मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
                
शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाल्यामुळे शासन निर्णयानुसार नुकसान बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याचे आव्हान शासनाने केले आहे. दि.१३/१०/२०२१ ला रोजी मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात चर्चा करण्यात आली. आणि दि.२१ ऑक्टोबर २०२१ ला नुकसान बाधित क्षेत्रात वाढीव दराने मदत करण्याचे आव्हान केले आहे.
                  
जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार (SDRF)च्या प्रचलित दरानुसार ₹ ६८००/- प्रति हेक्टर,२ हेक्टरच्या मर्यादेत, याऐवजी सरकारने मदतीचे वाढीव दर, ₹१०,०००/- प्रति हेक्टर,२ हेक्टर हेक्टरच्या मर्यादेत. आणि बागायत पिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार (SDRF) च्या प्रचलित दरानुसार, ₹ १३,५००/- प्रति हेक्टर,२ हेक्टरच्या मर्यादेत. याऐवजी शासनाने मदतीचे वाढीव दर, ₹१५,०००/- प्रति हेक्टर, २ हेक्टरच्या मर्यादेत. शेतकऱ्यांना बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार (SDRF) प्रचलित दर, ₹१८,०००/- प्रति हेक्टर, २ हेक्टरच्या मर्यादित. याऐवजी शासन निर्णयानुसार मदतीचे वाढीव दर ₹२५,०००/- प्रति हेक्टर,२ हेक्टरच्या मर्यादित देण्याचे निर्णय घेण्यात आले.
                 
अतिवृष्टी नुकसानबाधित क्षेत्रात पंचनामे करण्यात आल्यावर लाभार्थी निश्चित करण्यात यावे.आणि लाभार्थ्यांच्या थेट रक्कम बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात यावे. अशी माहिती महसूल विभागाकडून मिळत आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे.
शेतकऱ्यांना दिलासा;अतिवृष्टी क्षेत्रात नुकसान भरपाई देण्यास सरकार सज्ज शेतकऱ्यांना दिलासा;अतिवृष्टी क्षेत्रात नुकसान भरपाई देण्यास सरकार सज्ज Reviewed by सह्याद्री चौफेर on October 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.