सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (१४ ऑक्टो.) : महागांव तालुक्यातील कलगांव येथील शंकर तुकाराम चव्हाण यांचे तीन एकर शेतामधील सोयाबीन गंजीस आग लागल्याने लाखोचे नुकसान झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात व महसुल प्रशासनाकडे देण्यात आली आहे.
महागांव शहरालगत अनिल पांडे यांची शेतजमीन आहे. शेत सर्वे नंबर १८ मधील पाच एकर शेती ही कलगांव येथील शंकर तुकाराम चव्हाण हे मागील दहा वर्षांपासून मक्त्याने करीत आहेत. या वेळी त्यांनी तीन एकरात सोयबीन पिक घेतले होते. पिक हाताची आले परंतु अतिवृष्टीमुळे पिकाचे खुप मोठे नुकसान झाले होते परंतु मागील पाच दिवस पावसाने उसंत दिल्याने शंकर यांनी सात हजार रुपयांची मजुरी देवून सोयाबीन गंजी घातली होती.
दिनांक ०७ आक्टोंबरच्या मध्य रात्री गंजीस आग लागून संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले. त्यात त्यांचे एका लाखाचे नुकसान झाले आहे.संपुर्ण सोयाबीन जळाल्याने गरीब शंकरचे व्हत्याचे-नव्हते झाले आहे. पोलिस जमादार शरद एडतकर व तलाठी दिपक दिवेकर यांनी पंचनामे केले असून शासनाच्या मदतीची प्रतिक्षा शंकर चव्हाण करत आहे.
महागांव शेतशिवारात सोयाबीनच्या गंजीला आग;तीन एकरातील सोयाबीन जळून खाक,लाखोंचे नुकसान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 14, 2021
Rating:
