सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (६ ऑक्टो.) : कोरोना या संसर्गजन्य व जीवघेण्या आजारापासून नागरिकांचा बचाव व्हावा याकरिता शासनाने विकसित केलेल्या कोरोना वरील लसी नागरिकांनी घ्याव्या म्हणून आरोग्य यंत्रणेचे मोठे प्रयत्न सुरु आहे. तालुक्यातील नागरिकांचं लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हावं हे धेय्य बाळगून आरोग्य यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. कोरोनावर मात करण्याकरिता आधी शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढणं गरजेचं आहे. आणी हीच रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याचं काम ही लस करते. कोरोनावरील लसीचे दोन्ही डोज घेतल्यानंतर शरीरात रोग प्रतिकार शक्ती निर्माण होऊन नागरिकांचा कोरोना या आजारापासून बचाव होऊ शकतो. नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्याकरिता कोरोना लसीकरणाची ही मोहीम देशपातळीवर राबविली जात आहे. तालुक्यातही या लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग पकडला आहे. आरोग्य विभागाची लसीकरण पूर्ण करण्याची धडपड व लसीकरणाला नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे तालुक्यात लसीकरणाला गती मिळाली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित शेंडे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने शहरात व गाव पातळीवर लसीकरण मोहीम राबविली. गावात लसीकरणाची शिबिरं घेऊन नागरिकांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्यात आले. अंथरुणावर खिळलेल्या नागरिकांना घरी जाऊन लसी देण्यात आल्या. डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांचे मोलाचे योगदान या लसीकरण मोहिमेला लाभले आहे. तालुक्यात दररोज २ हजारांच्या वरून नागरिकांचे लसीकरण केल्या जात आहे. जेष्ठ नागरिक व अपंगांनाही विशेषत्वाने लस दिली जात आहे. सेवेचे तास न बघता आरोग्य यंत्रणा लसीकरणाला प्राधान्य देत आहे. त्यामुळे तालुक्यात आता पर्यंत ६६.०३ टक्के नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला डोज पूर्ण झाला आहे. तर २४.१४ टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोज घेतला आहे. तालुक्यात २ लाख ५ हजार ६७२ एवढी लोकसंख्या आहे. त्यापैकी १ लाख ५१ हजार १४१ लोकांचे लसीकरण करायचे आहे. तालुक्यात ४ ऑक्टोबर पर्यंत १ लाख ३५ हजार ३७४ लोकांचा लसीचा पहिला व दुसरा डोज पूर्ण झाला आहे. तालुक्यात ९९ हजार १३४ लोकांना लसीचा पहिला डोज तर ३६ हजार २४० लोकांना लसीचा दुसरा डोज देण्यात आला आहे. तालुक्यातील शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत १९ हजार ६८९ लोकांना, कोलगाव पीएसी अंतर्गत १४ हजार ५७२, कायर पीएसी अंतर्गत १९ हजार ६२९ तर राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत १९ हजार ५९१ लोकांना लसीचा पहिला डोज देऊन पूर्ण झाला आहे. त्याचप्रमाणे शहरातील ग्रामीण व इतर रुग्णालयांतर्गत २५ हजार ६५३ लोकांना लसीचा पहिला डोज देण्यात आला आहे. तालुक्यातील एकूण ६६.०३ टक्के लोकांना लसीचा पहिला डोज देण्यात आला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत २३ हजार ५१८ लोकांना व शहरातील रुग्णालयांतर्गत १२ हजार ७२२ लोकांना लसीचा दुसरा डोज देण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून जास्तीतजास्त लोकांचे लसीकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्या जात आहे.
लसीकरण मोहिमेला मिळत आहे जनतेचा उत्तम प्रतिसाद
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 06, 2021
Rating:
