विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाचा महागांव येथे भव्य रास्ता रोको व निषेध मोर्चा...

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (१९ ऑक्टो.) : गोर बंजारा व भटके-विमुक्त समाज बांधवांना गंभीर आवाहन करण्यात येत आहे कि, आपले भटक्या विमुक्त समाजाचे पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवणे किंवा संपवणे या संदर्भात दि.२१/१०/२०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे.
परंतु आपले भटके-विमुक्त समाजाचे पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणतेही ठोस प्रयत्न करण्यात येत नसल्यामुळे निकाल आपल्या विरोधात लागण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून या निर्णयाच्या विरोधात दि २०/१०/२०२१ बुधवार रोजी दुपारी १.०० वा.महागाव येथे भव्य रास्ता रोको व निषेध मोर्चा चे आयोजन करण्यात येत आहे.
तसेच आंदोलन करून सुध्दा जर या सरकारचे कान उघडले नाही तर लगेच साखळी उपोषण चे नियोजन करण्यात येणार आहे.तरी एक दिवस समाजासाठी देणे आपले कर्तव्य आहे.

म्हणून गोर बंजारा व भटके विमुक्त समाजातील सर्व संघटना व सर्व पक्षातील बंजारा व भटके-विमुक्त समाजातील सर्व पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी या भव्य रास्ता रोको व निषेध मोर्चा मध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
तसेच भटके-विमुक्त समाजातील सर्व संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा सहभाग अपेक्षित असून त्यांनी खालील मोबाईल नंबरवर संपर्क करावा.

डॉ अरविंद भिमराव पवार
९६९४९३६९२५,८६५७९४९४२८,
७०७५७२०१९९,७७९८७१९३३४,
७८८७६४६०३१,७६२०२७९१९४,
विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाचा महागांव येथे भव्य रास्ता रोको व निषेध मोर्चा... विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाचा महागांव येथे भव्य रास्ता रोको व निषेध मोर्चा... Reviewed by सह्याद्री चौफेर on October 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.