सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (१७ ऑक्टो.) : श्रीमान उपा.विठ्ठल माटे यांना हनुमान मंदिर सदाशिव नगर येथे सदगुरू शंकर बाबा महिला भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम चालु असतांना शुभम चंदु चवणे हा दारुच्या नशेत मदमस्त माथेफिरू तरूणाने सुरु असणार्या भजनात हुज्जत घालत विठ्ठल माटे यांना जेवणाचे ताट त्यांच्या तोंडावर फेकुन बुक्क्यांनी विनाकारण मारले. यात त्यांच्या ओठाला, मानेला मार लागला व त्यांचा चष्माही फुटला. ६० वर्षाच्या वयोवृद्ध तेही भजन सुरु असतांना मारणे हा निंदनीय व माणुसकिला काळीमा फासणारा गंभीर प्रकार मंदिरात व तेही माता दुर्गा यांच्या अधिष्ठानाजवळ घडला. त्यासाठी गुरुदेव सेवा मंडळ व सर्व माता भगिणींनी यांचा जाहिर निषेध नोंदवला. या गंभीर गुन्ह्याची रितसर तक्रार केली असता तो युवक विनाकारण विठ्ठल माटे व गुरुदेव सेवा मंडळाच्या मंडळींना उलट धमकी व आवाहन करतो. इतका उर्मट व हेकेखोरपणा त्या युवकात भरलेला आहे. त्यामुळे प्रशासनानी याविषयी गंभीर दखल घेवुन गुरूदेव सेवा मंडळाच्या जे सात्विक व प्रामाणिकपणे जनतेची सेवा व जनजागृती करतात. अशा सर्व मंडळींना संरक्षण द्यावे. नाहीतर गुरुदेव सेवा मंडळ हे जसे कायद्याचे पालन करणारे आहे. तसेच ते "हो चीड झुठी राह की अन्याय की सेवा करनको दास की तो पर्वा नही हो जान की" ठोशास ठोशे देणारे आहे आणि हा युवक वारंवार अशा विकृत प्रकारास घडवू नये. यासाठी प्रशासनानी अशा माथेफिरूवर कायम अंकुश ठेवावा. अशी मागणी विठ्ठल माटे, रुख्मिणी माटे सेवामंडळाचे प्रचारक विद्याताई जुनगरी, लताताई थेरे, भारत कारडे, मारोतराव ठेंगणे, मनोहर झाडे, किशोर भांदककर मारोती ढुमणे यांनी तक्रार देतांना केली.
सेवामंडळाचे प्रचारक यांचेवर भजनात हुज्जत घालत केला युवकाने'हल्ला'
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 17, 2021
Rating:
