सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (२ऑक्टो.) : पांढरकवडा येथे दिनांक ०१ ऑक्टोबर २०२१ ला राजर्षी शाहू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये"स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री भेदुरकर सर हे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुमारी आकांक्षा ज्ञानदेव देवढगले उपस्थित होती.विचारपीठावर विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री देवढगले सर आणि डॉ किशोर अगुवार हे उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना आपण सुरुवातीला ध्येय ठरवणे गरजेचे आहे. एकदा ध्येय ठरवले की त्या दिशेने कठीण परिश्रम,चिकाटी आणि जिद्द या जोरावर आपण कोणतीही परीक्षा पास करू शकतो. ध्येय ठरविल्यानंतर आर्थिक परिस्थिती ही अडचण येऊ शकत नाही असे त्यांनी स्वत: च्या अनुभवाने सांगितले. CA (Chartered accountant) होण्याचं स्वप्न वर्ग सातवीमध्ये बघितले आणि ते पूर्ण केले. असे त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मकथन केले. सर्व मुलांनी स्वत:चे ध्येय ठरवणे अत्यंत गरजेचे आहे आपण प्रत्येक दिवस आपल्या प्रगतीसाठी आपण काही ना काही करावं असं ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करितांना त्यांनी कथन केले. श्री भेदुरकर सर यांनी गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ किशोर अग्गुवार यांनी केले.सूत्रसंचालन कुमारी कृष्णा नवाडे तर आभार प्रदर्शन विद्यालयाची ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शोभा चौधरी यांनी मानले. सदर कार्यक्रम हा ऑफलाइन आणि ऑनलाइनच्या झूम मिटिंग माध्यमातून घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
राजर्षी शाहू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये "स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन" कार्यक्रमाचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 02, 2021
Rating:
